डुमरी येथील चोरी केलेला ट्रक्टर सह आरोपी पकडला. स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण ची कारवाई.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या घरा समोर उभा असलेला ट्रैक्टर चोरून नेऊन मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हयातील बडपा णी गावाच्या शेतात ट्रक्टर चालवित असताना आरोपी संतोष सोनवाने यास स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा पोलीसांनी शिताफितीने पकडुन त्याचा जवळुन चोरी चा ट्रक्टर जप्त करून आरोपी सह पुढील तपासा करिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले.
शुक्रवार (दि.२३) जुलै २०२१ ला रात्री २ ते २:३० वाजता दरम्यान डुमरी खुर्द येथील शेतकरी जनार्धन व्यंकटराव मद्दोपाटी वय ४६ वर्ष यांचा जाॅनडियअर कंपनीचा टैक्ट्रर घरा समोरून अज्ञात चोराने चोरी केल्याची कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी ची तक्रार दाखल असल्याने स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपु र ग्रामिण पोलीसांनी आरोपीचा शोध घेत मध्य प्रदेशा तील बालाघाट जिल्हयातील बडपाणी येथील आरोपी संतोष अनंताराम सोनवाने वय २६ वर्ष यास शेतात डुमरी खुर्द येथील चोरीचा ट्रक्टर चालवित असताना रंगेहाथ पकडुन ट्रैक्टर क्र. एम एच ४० बी ई ५००८ किंमत ३,००,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सह पकडुन कन्हान ला आणुन पुढील तपासा करिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले. ही कारवाई स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे सपोनि अनिल राऊत, साफौ लक्ष्मी प्रसाद दुबे, हेकॉ विनोद काळे, नापोशि शैलेश यादव, अरविंद भगत, सत्यशिल कोठारे, पोशि प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, चालक साहेबराव बिहाडे कन्हान पोस्टे चे विरेंद्र चौधरी, सुधिर चव्हाण आदीने शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535