जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थी गळती थांबविण्यासाठी शिक्षकाचा असाही उपक्रम स्वतः च्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत टाकले
कोंढाळी- दुर्गा प्रसाद पांडे
राज्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांमधिल विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे मराठी शाळा ओस पडत आहे तर दुसरीकडे बहुतांश पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे दिसुन येत आहे.कोंढाळी भागातील जुनापाणी येथे कार्यरत एका शिक्षकांने आई वडिल दोन्ही जिल्हा परिषद शिक्षक असतांना जुनापाणी सारख्या ग्रामीण भागातील शाळेत स्वतःच्या मुलाचा प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करुन शिक्षकां समोर आदर्श उदाहरण प्रस्तुत केले आहे.
विदर्भ विदर्भातील सन 2023 24 च्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा दिनांक 30 जून पासून सुरू झाल्या जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होत असताना बहुतांश पालकांचा कल कॉन्व्हेंट कडे असताना.जिल्हा परिषद शाळेत व मराठी शाळेत शिकवणारे शिक्षकही आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत टाकयला तयार नाही त्यामुळे मराठी शाळा मधिल शिक्षणांचा दर्जा चांगला नही असा लोकांचा गौरसमज थांबविण्यासाठी कोंढाळी येथील शिक्षक पमोद बोडखे हे जुनापाणी शाळेत शिक्षक आहे तर त्यांच्या पत्नी कोंढाळी शाळेत शिक्षिका आहे.बोडखे दांपत्याने आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्या ऐवजी जिल्हा परिषद शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. कोंढाळी पासून 8 कि.मी अंतरावरील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनापाणी येथील शिक्षक प्रमोद संपतराव बोडके यांनी आपल्या मुलागा स्पर्श प्रमोद बोडखे यांला इयत्ता पहिली मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनापाणी येथे प्रवेश दिला जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असताना स्वतःच्या मुलाला शासकीय शाळेत प्रवेश देऊन त्यांनी समाजापुढे एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.जुनापाणी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग 1 ते 7 पर्यत एकुण 36 विद्यार्थी आहे पण वर्ग 4 नंतर अनेक पालक आपल्या मुलांचे नांव काढून कोंढाळी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याच्या तयारीत असतांना कोंढाळी येथील एक शिक्षकच आपल्या मुलांचे नांव स्वतः कार्यरत असलेल्या शाळेत टाकत असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांची गळती तात्काळ थांबली.आजही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शाळा यामागे नाही हेच त्यांनी या कृतीतून सांगितले आहे जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे शाळेत शिक्षक संख्या कमी आहे काही शाळा तर शून्य शिक्षकांच्या आहेत शिक्षक भरती केल्या जात नाही शिक्षक नसल्यामुळे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देता येत नाही शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांचा कल कॉन्व्हेंट कडे वळतो जिल्हा परिषद शाळा जुनापाणी येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला शाळेत नव्याने दाखल झालेल्या वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांचे तसेच वर्ग दोन ते सातच्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणेश गणवेश वाटप करण्यात आला शालेय परिसर तोरण व पुष्प लावून सजविला होता प्रभात फेरी काढण्यात आली.
फोटो……जिल्हा परिषद शाळा जुनापाणी येथे प्रवेश घेणाऱ्या स्पर्श प्रमोद बोडखे यांचे स्वागत करतांना व जुनापाणी येथील शाळेत पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्याचे सत्कार व पाठपुस्तक वितरण….
