नागपुर

जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची

Summary

कोंढाळी प्रतिनिधी दुर्गा प्रसाद पांडे जत्रा शासकीय योजनांची अंमलबजावणी सर्व सामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी या नावाचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून व लोकप्रतिनीधींकडून राबविण्यात येत आहे व या उपक्रमात एकाच ठिकणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे. […]

कोंढाळी प्रतिनिधी
दुर्गा प्रसाद पांडे
जत्रा शासकीय योजनांची अंमलबजावणी सर्व सामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी या
नावाचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून व लोकप्रतिनीधींकडून राबविण्यात येत आहे व या उपक्रमात एकाच ठिकणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे. अशा प्रकारचे उपक्रम जिल्ह्यातील सर्व भागात होणे गरजेचे असल्याचे विविध लोकप्रतिनीधींनी शासनाच्या शासनाच्या निदर्शनास आणून आहे. त्यानुसार एप्रिल व मे 2023 मध्ये हा उपक्रम जिल्ह्यातील विविध भागात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. काटोल तालुक्यातील काटोल,कोंढाळी,मासोद, रिधोरा,मेटपांजरा,
पारडसिंगा व येनवा या सर्व सातही राजस्व मंडळाअंतरगत ही अभिनव योजना राबविण्यात येणार आहेत.अशी मा‌हिती ‌काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत ऊंबरकर व तहसीलदार आर रणविजय यांनी दिली आहे.
शासकीय योजना लोकाभीमुख करुन त्याांची अंमलबजानी गतीमान करण्यासाठी जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची हे अभियान राबवण्याचे शासनाने ठरवले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. याकवरता खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
काटोल तालुक्यातील सर्व राजस्व मंडळांमध्ये दिनांक 26 एप्रिल, 2023 ते 17मे, 2023 या कालाधीत जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
जत्रा शासकीय योजनांची या अभिनव योजनेची अंमलबजावणी बुधवार 26एप्रील रोजी काटोल तहसीलदार सभागृहात काटोल राजस्व मंडळाअंतरगत येणारी गावा चे कामें . तसेच गुरूवार 27एप्रील रोजी कोंढाळी राजस्व मंडळ लाखोटीया ‌भुतडा हायस्कूल ,मासोद राजस्व मंडळ -बुधवार-03मे रोजी-एड-शामकांत कडू विद्यालय मासोद, मेटपांजरा मंडळ-गुरूवार-04मे-ग्रामविकास विद्यालय मेटपांजरा, पारडसिंगा मंडळ -बुधवार-10मे जी प हायस्कूल पारडसिंगा,रिधोरा मंडळ-गुरूवार 11मे ग्राम विकास विद्यालय रिधोरा,येनवा मंडळ – बुधवार -17मे- उमप हायस्कूल येनवा.येथे जत्रा शासकीय योजनांची अंमलबजावणी सर्व सामान्यांच्या विकासाची,या अंतर्गत संबंधित राजस्व मंडळ अंतर्गत येणार्या गावातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यात येऊन संबंधित योजनांचे लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी माहीती देण्यात येणार असून आवश्यक कामांचा निपटारा ही करण्यात येणार आहे.अशी माहिती काटोल चे तहसीलदार राजू रणविजय यांनी कोंढाळी येथील प्रशासन आपल्या दारी चे आयोजन स्थळ लाखोटीया ‌भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणाची पाहणी दरम्यान माहिती दिली. या प्रसंगी – प्राचार्य गणेशराव सेंम्बेकर, पर्यवेक्षक सुधीर बुटे, मंडळ अधिकारी सुरज साददकर, ग्राम विकास अधिकारी अशोक जातगडे, ग्राम अधिकारी दुनेदार,सेतू केंद्र संचालक निलेश फरकाडे, राजेंद्र सरोदे, दिपक राव, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *