BREAKING NEWS:
नागपुर

घरफोडी, चोरीच्या गुन्हयातील तीन आरोपीसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकास पकडले स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीसांची कारवाई. खोपडी (खेडी) येथील २ सिलेंडर सह इतर ९ गुन्हयातील १,३९,००० रू. चा मुद्देमाल जप्त.

Summary

नागपूर कन्हान : – नागपुर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस पथक नागपुर ग्रामिण हद्दी गस्त करित असताना कन्हान ते रामटेक महामार्गावर एक तीन चाकी ऑटोत संशयितरित्या फिरणारे तीन इसम व एक […]

नागपूर कन्हान : – नागपुर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस पथक नागपुर ग्रामिण हद्दी गस्त करित असताना कन्हान ते रामटेक महामार्गावर एक तीन चाकी ऑटोत संशयितरित्या फिरणारे तीन इसम व एक विधिसंघर्षग्रस्त बालक मिळुन आल्याने सखोल विचारपुस केली असता त्यांनी नागपुर ग्रामीण हद्दीत ऑटो चा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केल्याने त्यांचा ताब्यातुन एकुण १,३९,००० रुपयाचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.१) जुलै २०२१ ला नागपुर ग्रामिण स्थानिय गुन्हे शाखा पोलीस निरीक्ष क अनिल जिट्टेवार यांच्या मार्गदर्शनात नागपूर ग्रामीण हद्दीत ग्रस्त करीत असतांना रामटेक कन्हान महामार्गा वर एका काळ्या रंगाचा तीन चाकी ऑटो क्र. एमएच – – ४९ – एआर -३०७९ मध्ये संशयितरित्या फिरणारे तीन इसम व एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्यांनी नागपुर ग्रामीण हद्दीत ऑटोचा वापर करून १) पोलीस स्टेशन रामटेक अप क्र.२३०/२१ कलम 454,380 भादंवि २) पोलीस स्टेशन कन्हान अप क्र.२८१/२१ कलम ४५७, ३८० भादंवि ३) पोलीस स्टेशन कळमेश्वर अप क्र.९१/२१ कलम ३७९ भादंवि ४) पोलीस स्टेशन सावनेर अप क्र.२९/२१ कलम ३८० भादंवि ५) पोली स स्टेशन सावनेर अप क्र. ५४/२१ कलम ४५७, ३८० भादंवि ६) पोलीस स्टेशन मौदा अप क्र.३११/२१ कलम ४५७ ३८० भादंवि ७) पोलीस स्टेशन देवलापार अप क्र. ४८/२१ कलम ४५७, ३८० भादंवि ८) पोलीस स्टेशन काटोल अप क्र.१०७/२१ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि ९) पोलीस स्टेशन बुटीबोरी अप क्र. १२९ /२१ कलम ४५७, ३८० भादंवि १०) पोलीस स्टेशन बुटीबोरी अप क्र.७३/२१ कलम ४५७, ३८० भा दंवि अश्या दहा चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबु ल केल्याने त्यांचा ताब्यातून १) एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत १०,००० रुपये २) बजाज मॅक्झीमा कंपनीचा ऑटो क्र. एमएच ४९ एआर ३०७९ किंमत १,००,००० रुपये ३) दोन एचपी कंपनीचे सिलेंडर किंमत ४,००० रुपये ४) एक हॉयर कंपनीची एलसीडी टिव्ही किंमत १०,००० रुपये ५) एक सेनसुई कंपनीची एलसीडी टिव्ही किंमत १०,००० रुपये ६) नगदी ५,००० रुपये असा एकुण १,३९,००० रुपयांचा मुद्देमा ल दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले असुन आरो पी १) मोहम्मद शहबाज मोहम्मद सलीम उर्फ घुंगरू वय २९ वर्ष, रा. कुंभारे कॉलनी कामठी २) इरफान सय्यद रुस्तम वय २० वर्ष, रा. आनंद नगर कामठी ३) मुन्ना उर्फ जिया खान नासरुल्लाह खान वय २८ वर्ष, रा.नया बाजार कामठी ४) एक विधिसंघर्षग्रस्त बालक असे चार आरोपींना ताब्यात घेऊन विधिसंघर्षग्रस्त बालक यास त्याच्या पालकांचे ताब्यात देण्यात आले असून तीन ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमालासह पुढील योग्य कायदेशीर कारवाई स्तव पोलीस स्टेशन रामटेक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कार्यवाही नागपुर ग्रामिण स्थानिय गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात सहा.पो.नि. राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, पोहवा नाना राऊत, निलेश बर्वे, पोना दिनेश आधापुरे, राजेंद्र रेवतकर, शैलेश यादव, पोशी विपीन गायधने, रोहन डाखोरे, अमोल वाघ, बालाजी साखरे, महेश बिसने, चालक अमोल कुथे व सायबर सेल चे सतीश राठोड यांनी शिताफीतीने यशस्विरित्या पार पाडली.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *