ग्रामीण भागही ‘CCTV’च्या निगराणीत घेण्यात यावा; ठाणेदार पंकज वाघोडे यांची माहिती
कोंढाळी – वार्ताहर
शहरी भागात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे, आपल्या भागात ग्रामीण भागात नव नवीन रिसोर्ट, संचालीत होत आहे. सर्वांना सुरक्षेसाठी हीच बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागातही लोकसहभागाची संकल्पना रुजवत कोंढाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या गावांचे पोलीस पाटील, सरपंच व सामाजिक संघटना चे पदाधिकार्यां च्या बैठकिचे आयोजन पोलिस ठाण्यात करण्यात आले . या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था चे जनप्रतिनिधी व सामाजिक संघटना चे जन सहयोगातून आप आपल्या गावांमध्ये दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास कोंढाळी पोलीस स्टेशन चे हद्दीतील सर्वच गावांमधून गुन्हेगारांचे उच्चाटन होण्यासाठी मदत होईल. शहरी गुन्हेगारांचा व चोरट्यांचा कल ग्रामीण भागाकडेही वळला आहे. आपल्या भागात मोठ्या प्रमाणात हायवे लगून आहे, ढाबे ,हाटेल, रिसोर्टस् बार आहेत. ग्रामीण भागात बैलजोडी, मोटारसायकल, शेती अवजारे, वीजमोटारी, घरफोडी आदी चोरीच्या घटना तसेच हाणामारी, मुलींची छेडछाड, निवडणुकीतील वाद आदी घटनांना आळा बसावा, या उद्देशाने ठाणेदार पंकज वाघोडे यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संकल्पना ग्रामीण भागात रुजविण्याची या बैठकीत माहीती दिली. सीसीटीव्हीसाठी लागणारा निधी हा लोकवर्गणीतून जमा करण्यात यावे अशीही माहिती बैठकीला उपस्थितांना देण्यात आली.
ए एस आय सुभाष साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
