BREAKING NEWS:
नागपुर

गणेश विसर्जनास कन्हान नदी काठावर व्यवस्था व पोलीसांचा कडक बंदोबस्त लावण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांचे नगर परिषद व पोलीस प्रशासना ला निवेदन.

Summary

संजय निंबाळकर/उपसंपादक कन्हान : – नागपुर जिल्ह्यात व ग्रामिण भागात होत असलेल्या सतत पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरुन वाहत असल्यामुळे गणेश विसर्जना च्या दिवशी कन्हा न नदी काठावर कुठलिही अनुचित घटना घडु नये या स्तव कन्हान नदी काठावर विसर्जनाची योग्य व्यवस्था […]

संजय निंबाळकर/उपसंपादक

कन्हान : – नागपुर जिल्ह्यात व ग्रामिण भागात होत असलेल्या सतत पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरुन वाहत असल्यामुळे गणेश विसर्जना च्या दिवशी कन्हा न नदी काठावर कुठलिही अनुचित घटना घडु नये या स्तव कन्हान नदी काठावर विसर्जनाची योग्य व्यवस्था करून पोलीसाचा कडक व तगडा बंदोबस्त लावण्या ची मागणी कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांनी कन्हान-पिपरी नगरपरिषद व पोलीस प्रशासना ला निवेदन देऊन करण्यात आली आहे.
नागपुर जिल्ह्यात व ग्रामिण भागात मागील काही दिवसा पासुन सतत जोरदार पाऊस येत असल्यामुळे नदी- नाले भरून वाहत असुन कन्हान नदीही दुथळी भरून वाहत असल्यामुळे याच महिन्याचा (दि.५) सप्टें बर ला गाडेघाट येथील अम्माचा दर्गा येथे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातुन दर्शनासाठी आलेल्या पाच युवकांचा कन्हान नदी पात्रात बुडुन मुत्यु झाला. चौघाचा मुत्युदेह मिळाला तर पाचव्या युवकांचा मुत्यु देह मिळाला नाही. अशी अत्यंत र्दुदैवी घटना घडली असुन वर्धा जिल्यातील नदी पात्रात नाव पलटल्याने ११ जणांचा मृत्यु झाला. सध्याचा परिस्थितीत पाऊस चांगलाच सुरु असुन कन्हान नदी दुथळी भरुन वाहत असुन कधीही नदी पात्रात पाणी कमी जास्त होत अस ल्याने रविवार (दि.१९) सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होऊ घातली असुन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना द्वारे सत्रापुरच्या कन्हान नदी काठावर गणेश विसर्जना करिता कुत्रिम तलाव, लाईट्स, कटघरे व इतर योग्य व्यवस्था करण्यात यावी तसेच पोलीसाचा कडक व तगडा बंदोबस्त लावण्या विषयी कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर च्या नेतृत्वात नगरपरिषद नगराध्यक्षा करू णाताई आष्टनकर आणि कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते यांना भेटुन चर्चा करून निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, कामेश्वर शर्मा, प्रशांत मसार, विनोद कोहळे, हरीओम प्रकाश नारायण, अक्षय फुले सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *