BREAKING NEWS:
नागपुर

कोरोना मृत कुटुंबांतील वारसदारांना शासकीय योजनेत समाविष्ट करून आर्थिक लाभ द्या.

Summary

नागपूर कन्हान : – राज्यात कोरोना थैमान पसरल्याने किती तरी सामान्य लोकांचे मुत्यु झाल्याने त्यां च्या कुटुंबावर उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्या ने शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार नी नागपुर जिल्हा अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडव यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.उद्धव […]

नागपूर कन्हान : – राज्यात कोरोना थैमान पसरल्याने किती तरी सामान्य लोकांचे मुत्यु झाल्याने त्यां च्या कुटुंबावर उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्या ने शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार नी नागपुर जिल्हा अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडव यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवुन कोरोना मृत कुटुंबांना शासकीय योजनेत समाविष्ट करून आर्थिक लाभ देण्याची मागणी केली आहे.
देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव अतिवेगाने वाढल्याने अनेक सामा न्य नागरिकांचे कोरोना आजाराने मुत्यु झाल्याने त्यांचा कुंटुंबावर उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्याने दैनंदि नी उपजिविका चालविण्या करीता काम करणे अत्यंत गरजेचे झाले असुन ते अश्यातच कोरोना आजाराचा विळाख्यात अडकुण त्यांनी आपल्या औषधा उपचारा करिता संपुर्ण आयुष्यात कमावलेल्या जमापुंजी (रोख रक्कम) आरोग्यावर लावली पण ते ही कामात न येता त्यांना आपला जिव गमवल्या नंतर त्यांच्या वारसदारां वर दुखाचे डोंगर कोसळुन आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट गंभीर झाली आहे. अश्या कुटुंबांना उदारनिर्वाह व जगण्याकरिता वणवण भटकाव लागत असल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांनी अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडव यांची भेट घेत चर्चा करून त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवुन तात्काळ कोरोना काळात मृत झालेल्या कुंटुबाना या संकटातुन बाहेर काढण्या करिता व त्यांचे वर्तमान, भविष्याकरिता त्यांना विविध शासकीय योजनेत समाविष्ट करून शासकीय योजना चा लाभ देण्यात यावा तसेच शासकीय आर्थिक मदत ही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, राजेश गजभिये, दिपक तिवाडे, मिलिंद मेश्राम, प्रशांत गजभिये, नरेश पाटील, सिद्धार्थ सुखदेव, विपीन गोंडा णे, चंदन मेश्राम, कुंदन रामगुंडे, भोला भोयर, आदेश मेंढेकर सह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *