BREAKING NEWS:
नागपुर

कोंढाळी येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन

Summary

कोंढाळी -वार्ताहर शनिवार दोआक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा कोंढाळी येथे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालयात स्थानिय राष्ट्रवादी कांग्रेस व कांग्रेस पार्टी यांचे वाढदिवसा निमित्य येथील लहानगे अराध्य पांडे, कनक राठी […]

कोंढाळी -वार्ताहर
शनिवार दोआक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा कोंढाळी येथे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालयात स्थानिय राष्ट्रवादी कांग्रेस व कांग्रेस पार्टी यांचे वाढदिवसा निमित्य येथील लहानगे अराध्य पांडे, कनक राठी व मयंक राठी यांचे हस्ते दोन्ही महामानवांना माल्यार्पण करण्यात आले . या प्रसंगी कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे यांचे अध्यक्षतेत व ग्रा प सदस्य सुनिता गजबे यांचे प्रमुख उपस्थित कार्यक्रम प्रसंगी सरपंच केशवराव धुर्वे यांनी सांगितले की महात्मा गांधींनी नेहमीच देशाला अहिंसेच्या मार्गावर चालायला शिकवले आहे. या कारणास्तव आजचा दिवस अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला चालना मिळाली. त्यांच्या एका हाकेवर हजारो आणि लाखो लोक जमायचे . 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधींचा जन्म झाला. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांच्या हत्येनंतर दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. गांधी जयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.आज गांधींची 153वी जयंती आहे.
गांधीजीं सोबतच भारत देशाचे दुसरे महान नेते आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचाही वाढदिवस आहे. जय जवान जय किसानचा नारा देणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नाव देशाच्या राजकीय इतिहासात एक साधे राजकारणी म्हणून घेतले जाते. 1964 मध्ये पंतप्रधान झालेले शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला. सुमारे दीड वर्षे पंतप्रधान असलेले शास्त्री यांचे 11 जानेवारी 1966 रोजी रशियातील ताशकंद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या प्रसंगी
कोंढाळी चे उपसरपंच स्वप्निलसिंह व्यास,ग्रा प सदस्य संजय राऊत,कमलेश गुप्ता, सुनीता गजबे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता दुर्गाप्रसाद पांडे, रा का पदाधिकारी याकूब पठाण, अरुण खोडणकर,नीतीन ठवले,आकाश गजबे, प्रशांत खंते, सुरेन्द्र कुर्वे सदाप पठाण, अफसर शेख, नितेश वनकर,कांग्रेस चे काटोल तहसील अध्यक्ष सतीश पाटील चव्हान, राष्ट्रपाल पाटील, पदम पाटील डेहणकर, राधेश्याम राठी, कूनाल भांगे ,अन्नू पठान,भूषण चांडक, रूपेश बुरडकर, प्रफुल्ल वानखेडे,सागर राठी, अतुल नेताजी ठाकरे, अरूण आष्टणकर,रजा ज़ावेद पठाण, फैजान शेख,भावेश पवार,समशेर शेख, हेमराज मसराम, चंद्रशेखर चरडे,नुरमहंमद शेख,राकेश पांडे,रत्नाकर साखरकर,अमर गुप्ता,सचीन हिवसे,शेख रशीद यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
*वृक्षारोपण व स्वच्छता अभियान*
कोंढाळी येथे महात्मा गांधी व शास्त्रीजी जयंती निमित्य वृक्षरोपन व पूजन
क्रीडांगण परिसरात झाडे लावली
स्थानिक लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे प्राचार्य श्री. गणेश शेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी जेष्ठ पर्यवेक्षक श्री. सुधीर बुटे ,सामाजिक उत्सव समितीचे विजय दुपारे, रत्नाकर दुपारे, ज्ञानेश्वर भक्ते, शैलेश चव्हाण, रवींद्र जायभाये, अनंता बुऱ्हाण, राजेंद्र गोमकर, यादव पंधराम, प्रकाशभाऊ मलवे, शुभम राऊत आदींची कार्यक्रमाला उपस्थित होती. तत्पूर्वी अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी व जय जवान जय किसान चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कोविड 19 च्या नियमाचे पालन करण्यात आले होते. शालेय क्रीडांगण परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *