BREAKING NEWS:
नागपुर

कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत आरोग्य अधिकार्या सह 17 पदे रिक्त

Summary

वार्ताहर – कोंढाळी – दुर्गा प्रसाद पांडे नागपूर-अमरावती-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06/53सोबतच हरियाणा-तामिळनाडूला जोडणारा राज्य महामार्ग 247 देखील कोंढाळीभागातुन जातो. येथील दोन्ही महामार्ग अपघातांसाठी कुख्यात मानले जातात. याशिवाय कोंढाळी येथे २४×७ आयपीएचएस प्राथमिक आरोग्य केंद्राला ४३ गावांतील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या […]

वार्ताहर – कोंढाळी –
दुर्गा प्रसाद पांडे
नागपूर-अमरावती-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06/53सोबतच हरियाणा-तामिळनाडूला जोडणारा राज्य महामार्ग 247 देखील कोंढाळीभागातुन जातो. येथील दोन्ही महामार्ग अपघातांसाठी कुख्यात मानले जातात. याशिवाय कोंढाळी येथे २४×७ आयपीएचएस प्राथमिक आरोग्य केंद्राला ४३ गावांतील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी आहे.
महामार्ग व राज्य महामार्गामुळे अपघात प्रवण क्षेत्रा मुळे कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राची संवेदनशील आरोग्य केंद्रांमध्ये गणना होते.
येथील आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी आठ तास या तत्त्वावर तीन एमबीबीएस आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. तरीही केवळ दोनच आरोग्य अधिकारी नियुक्त आहेत.त्यातही सध्या एकच अधिकारी कार्यरत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळीसाठी नियमित आरोग्य अधिकारी (एमबीबीएस) नियुक्त करणे आवश्यक आहे. मात्र कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नियमित आरोग्य अधिकारी उपलब्ध नाहीत. बंधपत्रित एमबीबीएसची नियुक्ती झाली असली तरी पीजी प्रशिक्षणासाठी चार-सहा महिन्यांनी आरोग्य अधिकारी पदाचा राजीनामा देतात. मग रिक्त पदासाठी आरोग्य अधिकारी पद भरण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी व अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करावी लागत आहे.
सध्या येथील आरोग्य केंद्रात एक आरोग्य अधिकारी आहेत. दुसरे मासोदच्या उपकेंद्रातून आरोग्य अधिकाऱ्याला बोलवावे लागते.
*कोंढाळी आरोग्य केंद्रातर्गत १८ पदे रिक्त*
कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राची गणना संवेदनशील आरोग्य केंद्रांमध्ये केली जाते. तरीही आरोग्य केंद्र आणि आपला दवाखान्यासाठी मंजूर पदांपैकी १८ पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये एक एमबीबीएस आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका-०६, आरोग्य सेवक-०२, आरोग्य सेवक-हिवताप-०३, परिचारिका-०४, शिपाई-०१, वाहन चालक-०१-एकूण 18 पदे रिक्त आहेत.
कोंढाळी आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह सर्व राजकीय संघटना/पक्षांचे अधिकारी, स्थानिक आरोग्य समितीच्या अधिकाऱ्यांकडून जि प अध्यक्ष-मुक्ताताई कोकर्डे, जि प उपाध्यक्ष व सभापती आरोग्य सेवा कुंदाताई राऊत, जि प सी ई ओ सौम्या शर्मा यांचे कडे करण्यात आली आहे.
या विषयावर नागपूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्र हे महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. आपला दवाखान्यासह आरोग्य अधिकाऱ्यासाठी मंजूर आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. तसेच एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्याचे रिक्त पद ही भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहितीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *