BREAKING NEWS:
नागपुर

कोंढाळी परिसरातील बॅट्री संच चोरीची कबूली दोन बॅट्री संच जप्त

Summary

कोंढाळी वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे दि.01/03/2023 रोजी पोलीस स्टेशन कोंढाळी येथे फिर्यादी नामे आशिष नरसिंगराव खंडागळे वय 33 वर्ष राहणार श्रीकृष्ण अपार्टमेंट प्लॉट नंबर 202 नागपूर यांनी पोस्टला येऊन तोंडी रिपोर्ट दिली की दिनांक 23/02/23 चे12/00 वा ते दि.24/04/23 चे 08/00 […]

कोंढाळी वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे

दि.01/03/2023 रोजी
पोलीस स्टेशन कोंढाळी येथे फिर्यादी नामे आशिष नरसिंगराव खंडागळे वय 33 वर्ष राहणार श्रीकृष्ण अपार्टमेंट प्लॉट नंबर 202 नागपूर यांनी पोस्टला येऊन तोंडी रिपोर्ट दिली की दिनांक 23/02/23 चे12/00 वा ते दि.24/04/23 चे 08/00 वा दर घुबडी गावाजवळील गुनाबी टाॅवरला विद्युत पुरवठा करण्याकरता लावण्यात आलेल्या अमर राजा कंपनीच्या 29 बॅटऱ्या किंमती 29,000 रु च्या माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले आहे अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
मा.न्यायालय कोर्ट काटोल येथून प्रोडयुस वारंट घेऊन मध्यवर्ती करागृह जी.अमरावती येथून आरोपी नामे 1) शेख कलिम उर्फ अलीम शेख मेहबूब 34 वर्ष जाफर नगर रोज कॉलनी नागपूर 2) रोशन धनराज धोत्रे वय 26 वर्ष राहणार विकास नगर कोंढाळी यांना प्रोडयूस वाॅरंटवर दि.13/06/23 यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपी यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 29, बॅटरी पैकी दोन बॅटऱ्या किमती 2,000 रू ची जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई मा.श्री. विशाल आनंद पोलीस अधीक्षक,मा. संदीप पखाले अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण,मा.बापु रोहोम उपविभागीय पोलिस अधिकारी काटोल यांचे मार्गदर्शनात स.पोनि पंकज वाघोडे पोस्ट कोंढाळी,पोहवा दारासिंग राठोड ब.नं/2048, पोहवा. सुधीर राठोड ब.नंं./52 पो.शि.सुनिल मोरे ब.नं/ 498, पो.शि. मंगेश सावरकर ब.नं /2255 डी.पोशि/ अनिल ढोके ब.नं/44 पो.स्टे कोंढाळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *