के.सी.सी. धारक शेतकऱ्यांना कृषी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आवाहन 92 टक्के खरीप पीक कर्ज वाटप ७८२ शेतकऱ्यांना १० कोटींचे पीक कर्ज वाटप

कोंढाळी- वार्ताहर-:
गरजू शेतकऱ्यांनी कृषी पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून पीककर्ज घेण्याचे आवाहन बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळीचे व्यवस्थापक राहुल सोरमारे यांनी केले आहे. यावेळी कोंढाळी परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना
बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळी चे व्यवस्थापक राहूल सोरमारे यांनी सांगितले की बी ओ आय कोंढाळी शाखेला12 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 07 ऑगस्ट 2023 पर्यंत 782 किसान क्रेडिट कार्डधारक शेतकर्यांना 10 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच सध्या 20 शेतकर्यांचे पीक कर्ज अर्ज मंजूर केले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांना कृषी पीक कर्जाची गरज आहे त्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर खरीप पीक कर्ज घेण्याचे आवाहन करन्यात आले आहे.
प्रशासक राहुल सोरमारे यांनी केसीसी धारक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून100%
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कोंढाळी यांना शेतकरी पीक कर्जाचे तीन कोटी रूपये वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. कोंढाळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोंढाळीचे तीन कोटी रुपयांचे कृषी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, ३० जुलैपर्यंत तीन कोटी तीन लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र मानेराव व कृषी अधिकारी राधेश्याम नरोलिया यांनी दिली.
एस बी आय कोंढाळी 88%
एस बी आय शाखा कोंढाळीला दिलेल्या उद्दिष्टांतर्गत 88% शेतकऱ्यांना कृषी पीक कर्ज वाटपाची माहिती बँक प्रशासक तिमांडे यांनी दिली आहे.