कारची दुचाकीला धडक एकाचा मुत्यु तर दुसरा जख्मी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ५ किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी अण्णामोड जवळ दोन मित्र हे हिरो डिल्कस दुचाकीने नागपुर ला जात असतांना कार चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीने चालवुन मोटार सायकल ला समोरून धडक मारून झालेल्या अपघातात फिर्यादी चा पाय फ्रॅक्चर झाला असुन त्यांचा गावकरी मित्राचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी ने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.५) सप्टेंबर २०२१ ला सकाळी ११ वाजता दरम्यान फिर्यादी नामे जनक सोमाजी नेवारे वय ३५ वर्ष राह. हुडकिटोला बुधबुधा जि. बालाघाट मध्यप्रदेश व त्याच गावात राह णारा मित्र सुनिल यशवंत पटले वय २५ वर्ष हे दोघेही डबलसिट हिरो डिल्कस दुचाकी क्र. एमपी ५० -एम आर – ५२३१ ने कन्हान मार्ग नागपुर ला जात असता ना नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील डुमरी अण्णा मोड जवळ एमएच -२४ -एएफ – २२६६ क्रमांकाच्या कार चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन जनक नेवारे यांच्या मोटार सायकल दुचाकी ला समोरून धडक मारल्याने झालेल्या अपघातात जनक नेवारे यांच्या पाय फ्रॅक्चर व मानेला टाके लागले असुन उपचार सुरु आहे. आणि दुचाकीच्या मागे बसलेला मित्र सुनिल पटले यास जबर दुखापत झाल्याने मेडि कल कॉलेज नागपुर येथे उपचारा दरम्यान मरण पाव ला. सदर प्रकरणी फिर्यादी जनक नेवारे यांचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी कारचालका विरुद्ध कलम २७९, ३३८, ३०४ (अ) भादंवी सह कलम १८४ मोटार वाहन कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करीत आहे.