नागपुर

काटोल विधानसभा मतदारसंघातील मतदान यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला प्रारंभ एक जून ते 16आगस्ट 2023पर्यंत मुदत

Summary

कोंढाळी/काटोल -प्रतिनिधी- दुर्गाप्रसाद पांडे 48-काटोल विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना काटोल विधानसभा मतदारसंघ चे निवडणूक नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी काटोल राजू रणवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून ते 16 ऑगस्ट 2023 मतदान यादीचा विशेष पुनरीक्षण या कार्यक्रम जाहीर झाला आहे. […]

कोंढाळी/काटोल -प्रतिनिधी- दुर्गाप्रसाद पांडे
48-काटोल विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना काटोल विधानसभा मतदारसंघ चे निवडणूक नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी काटोल राजू रणवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून ते 16 ऑगस्ट 2023 मतदान यादीचा विशेष पुनरीक्षण या कार्यक्रम जाहीर झाला आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदान नोंदणी करून घ्यावी. तसेच मतदार यादी बरोबर आधारकार्ड जोडण्यात यावे, असे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने मतदान नोंदणी चालू केली आहे. त्यासाठी NVSP.IN हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. VOTER HELPLINE हे अॅप्लिकेशनही उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक गावांमध्ये बिएलओकडे देखील ऑफलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येते.
या कालावधीत मतदान ओळखपत्र दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र आधारकार्डशी जोडणे, मतदार यादीतील नाव कमी करणे अशी सर्व कामे करता येतील. जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी, यासाठी शैक्षणिक संस्था, कारखाने, औद्योगिक संस्था यांना देखील मतदार नोंदणी करण्याचे आवाहन काटोल चे तहसीलदार निवडणूक मतदार नोंदणी अधिकारी राजू रणवीर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *