नागपुर

कांद्री येथुन दहाचाकी ट्रक चोरी

Summary

संजय निंबाळकर/उपसंपादक कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्र. ५ येथे उभा असलेला दहाचारी ट्रक कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त […]

संजय निंबाळकर/उपसंपादक

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्र. ५ येथे उभा असलेला दहाचारी ट्रक कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.१२) सप्टेंबर चे रात्री ११ वाजता ते सोमवार (दि.१३) सप्टेंबर चे सकाळी ५ वाजता दरम्यान श्री. दर्शन रघुनंदन टिकम वय ३० वर्ष राह. वार्ड नंबर ५ कांद्री, कन्हान याचे मालकीचा दहाचाकी ट्रक क्र. एम.एच ४० बी.जी ५२५९ ज्याचा चेसिस नं.४४४०२६ सीटीझेड७११०७८ व इंजिन नंबर ६९७टीसी५७सीटीझेड८२१५०३ अंदाजे किंमत ४ लाख ५० हजार रूपयाचा ट्रक कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला. अश्या फिर्यादी श्री दर्शन रघुनंदन टिकम यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी चोरा विरुद्ध अप क्र.३३९/२०२१ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *