करंभाड व चारगाव येथे ़भाजप पदाधिका-यांची पुर्व तयारी बैठक व चर्चासत्र संपन्न.

पारशिवनी (कन्हान) : – येत्या काळात होऊ घातले ल्या जिल्हा परिषद, पंचायत समीतीच्या पोट निवड णुक २०२१ करिता भाजपा जिल्हा व तालुका पदाधि का-यांची पुर्वतयारी बैठक व चर्चा सत्राचे तालुक्याती ल जि प करंभाड व प स अंतर्गत चारगाव येथे संपन्न झाली.
भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या प्रमुख उप स्थितीत येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुक २०२१ करिता पुर्व तयारी बैठक व चर्चा सत्राचे तालुक्यातील करंभाड जिल्हा परिषद क्षेत्रात दु.२ वाजता आणि करंभाड पंचायत समिती अंतर्गत चारगाव सायंकाळी ४ वाजता येथे संपन्न झाली. याप्रसंगी भाजपा नागपूर जिल्हा ग्रा. महामंत्री इमेश्वरजी यावलकर, तालुका अध्यक्ष अतुल हजारे, डॉ.राजेश ठाकरे, प्रकाश वांढे, कमलाकरजी मेंघर, अशोकजी कुथे, राजुजी कडु, प्रतिक वैद्य, मनोज गिरी, सौरभ पोटभरे, आशिष भुरसे, परसराम राऊत, कृष्णा मेंघर, बंडु ठाकरे सह गावकरी नागरिक आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते गण उपस्थिती होते.