कन्हान ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
कन्हान : – नवनिर्मित नवोदय जनोत्थान संघटन कन्हा न च्या वतीने सहित्य रचनाकार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती क्रांती भुमि डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक कन्हान व संताजी नगर कांद्री येथे साजरी करण्यात आली.
रविवार (दि.१) ऑगस्ट ला नवनिर्मित नवोदय जनोत्थान संघटन कन्हान अध्यक्ष प्रविण गोडे व पदा धिकारी, सदस्यांच्या हस्ते सामुहिक रित्या डॉ बाबा साहेब आंबेडकर चौक कन्हान आणि संताजी नगर कांद्री येथे सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्य रचनाकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यां च्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी सचिव प्रदीप बावने, कोषा ध्यक्ष सतीश ऊके, प्राध्यापक महेश शेंडे, सदस्य सोनु खोब्रागडे, सोनु मसराम, ज्ञानेश्वर दारोड़े आदीने
साहित्यीक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवना वर प्रकाश टाकीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमा चे सुत्रसंचालन अखिलेश मेश्राम हयानी तर उपाध्यक्ष संजय रंगारी यांनी केले. अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमास नवोदय जनोत्थान संघटन कन्हान चे सह सचिव अभिजीत चांदुरकर, मनिष शंभरकर, प्रकाश कुर्वे, कैलाश हुमने, अरूण थापा, संदीप गजभिये, प्रविण माने, विक्रम खड़से, संदीप शेंडे, राजेश देवळे, नितिन मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क