कन्हान ला पोलीस स्मृति दिवसा निमित्य शहिदांना श्रद्धांजली अर्पण
कन्हान : – शहर विकास मंच द्वारे पोलीस स्मृति दिवसा निमित्य गांधी चौक कन्हान येथे मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार, पुष्प अर्पित करित दोन मिनटाचे मौनधारण करून कर्तव्य बजावित शहिद झालेल्या सर्व भारतीय पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
गुरुवार (दि.२१) ऑक्टोंबर २०२१ ला पोलीस स्मृति दिवसा निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे पोलीस स्टेशन च्या बाजुला गांधी चौक कन्हान येथे कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे, सपोनि आमि तकुमार आत्राम, पोहवा अरूणकुमार सहारे, पोशि शरद गिते व शिक्षिका वर्षा सिंगाडे आदी मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिका-यांनी व नागरिकांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करून दोन मिनटाचे मौनधारण करून लडाख येथे चीनच्या सैनि का सोबत झालेल्या भाड हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रशांत मसार, महादेव लिल्हारे, संजय चोप कर, बलीराम यादव, पाली, हर्ष पाटील, किरण ठाकुर, प्रकाश कुर्वे, अक्षय फुले, शुभम मंदुरकर सह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र साबरे यांनी तर आभार ऋृषभ बावनकर यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, हरीओम प्रकाश नारायण, महेंद्र साबरे, सुरज वरखडे सह मंच पदाधिका-यांनी सहकार्य केले.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
9579998535