कन्हान नगरपरिषद अंतर्गत मच्छी मार्केट रस्ता व नालीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम
कन्हान : – राष्ट्रीय महामार्ग व कन्हान शहराचा मुख्य रस्ता वरील गांधी चौक ते पिपरी गावाकडे जाणा-या मच्छी मार्केट मधिल रस्ता वारंवार उखडने, नाली वरी ल रपटयावर गड्डे पडत असल्याने ये-जा करणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्ता व नाली निकृष्ट बांधकामाची संबधित विभाग व नगर परिषद प्रशासनाने चौकसी करून हा वर्दळीचा रस्ता व नाली रपटा बांधकाम नव्याने व्यवस्थित कर ण्याची मागणी होत आहे.
कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र ७ मच्छी मार्केट मधुन पिपरी ला जाणाऱ्या रस्त्यावर वारं वार रस्ता उखडने नालीवरील रपटयाला गड्डे पडणे नेह मीचेच झाले आहे. या रस्त्यावरून दिवसभरात हजारो लोक ये-जा करतात. अश्या गड्डे पडलेल्या व उखडले ल्या रस्त्यावरून ये-जा करण्यास नागरिकांना तारेवर ची कसरत करावी लागते. अश्या नेहमी उदभवणाऱ्या परिस्थिती ला येथील नगर प्रशासन जबाबदार आहे. कारण येथे दरवर्षी दुरुस्ती केली जाते. परंतु हा रस्ता उखडणे, गड्डे पडणे म्हणजेच रस्ता व नाली बाधकाम करणारे कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून व्यवस्थित रस्ता व नाली बांधकाम करित नस ताना सुध्दा नगरपरिषदेचे अधिकारी कंत्राटदारास अवाढव्य बिल प्रशाशना कडून कसे काय काढुन देता त ? अशी उलट सुलट चर्चा नागरिकांत होत असल्याने या प्रभाग क्र.७ मधील रस्ता व नाली बांधकामाची प्रशासनाने योग्य काळजी पुर्वक चौकसी करून एकदा चा सोक्ष मोक्ष लावुन हा वर्दळीचा रस्ता व नाली रपटा बांधकाम नव्याने व्यवस्थित करण्याची आग्रही मागणी आकीबभाई सिद्दीकी यांनी संबधित विभागास आणि नगरपरिषद प्रशासनास केली आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा
9579998535