ओव्हरलोड वाहतुकीने कोंढाळी येथील सर्हिस रोड व मुख्य मार्गाचे धिंडवडे! महामार्गावरील जीवघेणे खड्डे अपघाताचे नियंत्रण
Summary
वार्ताहर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु महामार्ग आणि राज्य महामार्गा ला जोडनार्या कोंढाळी येथील चौपदरी करनाचे सेवामार्गा (सर्ह्विस रोड) मार्गांवरून सावनेर,खापा येथील रेती घाटावरूनअतिभार क्षमतेचे ट्रक,डंफर चे वाहतूकी मुळे गत काही […]
वार्ताहर-कोंढाळी
राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु महामार्ग आणि राज्य महामार्गा ला जोडनार्या कोंढाळी येथील चौपदरी करनाचे सेवामार्गा (सर्ह्विस रोड) मार्गांवरून सावनेर,खापा येथील रेती घाटावरूनअतिभार क्षमतेचे ट्रक,डंफर चे वाहतूकी मुळे गत काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. रेतीघाटावरून वर्धा, अमरावती कडे जाणाऱ्या सडकेच्या सर्ह्विस रोडची तर विचारायची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या सर्ह्विस रोड नेओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. यामुळे येथील सर्ह्विस रोड तो ही येथील के जी टू पी जी पर्यंत शैक्षणिक संस्थेसामोरी महामार्गाचे सर्हिस रोड वर ठिकठिकाणी उखडले आहेत. बांधकाम विभाग रस्त्यांची डागडुजी करते.
*ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचे धिंडवडे* ।
पावसाळा आला की, रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. ठिकठिकाणचे रस्ते उखडतात. रस्त्यावरून चालणे कठीण होते. पावसामुळे रस्ते खड्येमय झाल्याची बोंब ठोकली जाते. मात्र, कोंढाळी येथील सर्ह्विस रोडच्या रस्त्यांचे खरे धिंडवडे ओव्हरलोड वाहतुकीने त्यातही रेतीच्या वाहनांमुळे निघत आहेत. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आरटीओची असली तरी खड्डेमय रस्त्यांच्या डागडुजीचा फटका आधिच निकृष्टत बांधकाम करनार्या अटलांटा बांधकाम कंपनी ला बसतो. नागपुर-अमरावती महामार्गा वर नागपुर (वाडी)ते कोंढाळी (सोनेगांव)सीमे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे देखरेखी खाली 43-00की मी चे बांधकाम अटलांट सडक बांधकाम कंपनी कडून बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर या महामार्गाचे चौपदरीकरनाचे बांधकाम करण्यात आले। या भागातील बांधकामाचे दुरूस्ती व डागडूजी ही संबधित बांधकाम कंपनी कडूनच करण्यात आले.
या बांधकाम कंपनी कडून बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर बांधण्यात आलेल्या मार्गावर व कोंढाळी येथील सर्ह्विस रोड वर खड्डे तर पाचविलाच पुजले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरून रेती,मुरूमाचे ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. अटलांटा कंपनी रस्त्यांची डागडुजी करते. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होते. पावसाळ्याच्या काळात तर हमखास रस्ते उखडतात.
रस्ते उखडले की पावसाळ्याचे कारण पुढे करून त्यावर पांघरूण घातले जाते. मात्र, ओव्हरलोड वाहतुकीचा कुणीही उल्लेख करीत नाही. ३० ते ४० टन वजन घेऊन वाहने धावत असतात. यामुळे रस्ते पूर्णत: नादुरुस्त होत आहेत.
ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची आरटीओकडून नियमित तपासणी केली जाते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गावर धावणाऱ्या वाहनांची कधीच तपासणी होत नाही. आरटीओची जबाबदारी असली तरी रस्ता दुरुस्तीचा भुर्दंड मात्र
सर्व साधारन नागरिकांना व दुचाकी, चार चाकी व अन्य वाहन चालकांवर बसत आहे। मात्र नागरिकांच्या रोषाचा सामना स्थानिय स्वराज्य संस्थाना करावा लागतो. सोबतच या खड्यांमधे साचलेले पावसाचे पाण्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहनांचे चाके खड्यात फसून अनेकदा टायर फुटून जीवघेणे अपघात होतात ।
या भागातून रेती दगड खणिज चे अतिभारक्षमते ची वाहतूक करनारे वाहन चालक-मालक यांचे राजस्व पोलीस व परिवहन विभागाचे सालेलोटे असल्याने तसेच या अवैध वाहतूकीला राजकिय व प्रशासकीय अभय असल्याचे सांगितले जाते यातून गृह, राजस्व व परिवहन विभागाचे संबधीत क्षेत्राचे निरिक्षकांचा फायदा । मात्र ! याचा फटका सर्व सामान्य वाहन चालक व वाहन धारकांना बसत आहे। या कडे कुणाचे लक्ष नाही। हे विशेष!!

