इंदिरा नगर कन्हान येथुन भरदिवसा दुचाकी वाहन चोरी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत इंदिरा नगर येथुन घरासमोर ठेवलेली दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला निशांत चौकसे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मंगळवार (दि.२४) ऑक्टोंबर ला निशांन राम किसन चौकसे हा रामदास बावनकुळे इंदिरा नगर कन्हान यांच्या घरी किरायाने राहत असुन तो सोमवार ला रात्री कामावर जावुन मंगळवारी सकाळी घरी येऊन आपली दुचाकी वाहन घरासमोर उभी करून आत मध्ये जाऊन झोपले व दुपारी ४ वाजता सुमारास उठल्यावर बाहेर येऊन पाहिले असता त्यांची दुचाकी वाहन क्र. एम पी २८ एम ई ८४२३ न दिसल्याने परिस रात शोध घेऊन मिळुन न आल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला निशांत चौकसे यांचे तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाख ल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535