BREAKING NEWS:
नागपुर

आदर्श हायस्कुल मुख्याध्यापिका सौ मसाळकर ना सेवानिवृतीपर समारंभासह भावपुर्ण निरोप

Summary

नागपुर कन्हान : – आदर्श हायस्कुल कन्हान च्या मुख्याध्यापि का सौ शुभदा मसाळकर हयानी शाळेत ३० वर्ष सेवा कार्य करून सेवानिवृत झाल्याबद्दल हायस्कुल व्दारे समारंभासह संस्था संचालन मंडळाच्या अध्यक्षा व सचिव हयांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून […]

नागपुर कन्हान : – आदर्श हायस्कुल कन्हान च्या मुख्याध्यापि का सौ शुभदा मसाळकर हयानी शाळेत ३० वर्ष सेवा कार्य करून सेवानिवृत झाल्याबद्दल हायस्कुल व्दारे समारंभासह संस्था संचालन मंडळाच्या अध्यक्षा व सचिव हयांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून भावपुर्ण निरोप देण्यात आला.
आयडियल एज्युकेशन सोसायटी कन्हान व्दारे संचालित आदर्श हायस्कुल कन्हान या हिंदी माध्यमा च्या शाळेत सौ शुभदा मसाळकर हयानी ३० वर्ष सेवा देत मुख्याध्यापिका पदावर असताना (दि.३०) जुन २०२१ ला सेवानिवृत होत असल्याने हायस्कुल व्दारे समारंभाचे आयोजन करून संस्थेचे सचिव मा. भरत साव़ळे याच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी संस्थेच्या अध्यक्षा पुष्पा व्दिवेदी, उपाध्यक्ष लालजी बारई, वेको लि वेल्फेअर अधिकारी मा शेगावंकर, माजी मुख्याध्या पक ए आर कावळे आदी मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्या पिका सौ शुभदा मसाळकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छाने सत्कार करून उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दे़त भावपुर्ण निरोप देण्यात आला. यावेळी मान्यवरां नी सौ मसाळकर यांच्या हायस्कुल आणि मुख्याध्या पिका म्हणुन दिलेल्या शैक्षणिक व प्रशासनिक सेवा कार्याचे कौतुक, स्तुती करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन साहाय्यक शिक्षक मनोज डोंगरे सरांनी केले. तर यशस्वितेकरिता आदर्श हायस्कुल कन्हान च्या साहाय्यक शिक्षिका चंद्रकला मेश्राम, प्रिती बोपचे, कु छाया मिसार, रेणुका वर्मा, अनिता हारगुडे, सुरेश वंजारी, जगदिश दुबे, अरविंद नेवारे सह प्रायमरी, माध्यमिक व हायस्कुलच्या शिक्ष क, शिक्षिका आणि शिक्षेकत्तर कर्मचा-यांनी सहकार्य करून मुख्याध्यापिका सौ शुभदा मसाळकर हयांना निरोप समारंभासह शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *