आंगणवाडी च्या नविव लोखंडी गेटचे उदघाटन.
कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग ७ येथील आंगणवाडी क्र १४२ येथे नगरसेविका रेखा ताई टोहणे यांच्या निधीतुन लावलेल्या नविन लोंखंडी गेटचे उदघाटन करण्यात आले.
बुधवार (दि.७) जुलै ला नगरपरिषद कन्हान पिपरी अंतर्गत प्रभाग क्र.७ येथील आंगनवाडी क्र १४२ च्या शिक्षिका रंजनी अहीर व मदतनीस फुटाने मॅडम यांचा समक्ष नगरसेविका रेखाताई टोहणे यांच्या निधीतुन लावण्यात आलेल्या लोखंडी गेटचे प्रमुख पाहुण्या श्रीमती रिताताई बवै अध्यक्षा कन्हान शहर महिला कॉंग्रेस यांच्या हस्ते गेट ला पुष्पहार व श्रीफळ फोडुन उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने श्री नरेश भाऊ बवै नगरसेवक व उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी, योगेन्द्र भाऊ रंगारी नगरसेवक , मनीष भाऊ भिवगडे, विनय भाऊ यादव, रेखाताई टोहणे, गुंफाताई तिडके तसेच सुनीताताई मानकर, सौ सविता ताई बावणे, प्रदीप बावणे, सुप्रीत बावणे, ईश्प्रीत बावणे, वेदांत ऊके आदी काय॔कते उपस्थित होते.