समाज परिवर्तनाच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीत सुशिक्षितांचे योगदान – विनोद लांडगे
दिनांक 18 मे 2023 ला बुद्ध विहार नांदेड येथे सामाजिक बांधिलकी जोपासून बौद्ध उपासक उपसिका यांचे समाज परिवर्तन चळवळीमध्ये योगदान या विषयावर समाजाची भूमिका विशद करण्यात आली. बाबासाहेबांच्या विचाराचे राष्ट्र निर्माण करण्यासाठी फुले आंबेडकर विचारमंच तळोधी ( बा) प्रत्येक गावागावात जाऊन सामाजिक प्रबोधनासाठी कटिबद्ध आहे असे मत आंबेडकर चळवळीचे सैनिक विनोद लांडगे यांनी मांडले. अडीच हजार वर्षानंतरही या देशांमध्ये समता मुलक समाज निर्माण झाला नाही त्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
या देशातील शोषिताना मानवी हक्क राज्यघटनेचा माध्यमातून मिळाले; पण ते हक्क खाजगीकरण करून देशातील मनुवादी व्यवस्थेने संपविले. फुले आंबेडकर विचारमंच तळोधी (बा) माध्यमातून तळोधी परिसरातील प्रत्येक गावागावातून प्रबोधनाची चळवळ राबविण्यात येईल.
सदर कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी प्रा विलास वानखेडे सर, जेष्ठ मार्गदर्शक म्हणून पी .के .जनबंधु सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. बारसागडे पोलीस पाटील नांदेड यांनी केलं आभार नरेंद्र बारसागडे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बौद्ध उपासक उपसिका यांनी मोलाचे सहकार्य केले.