संग हॉटेलचे संदीप कोहडे यांची कळमना गावाजवळ गळफास लावून हत्त्या की आत्महत्या?
Summary
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. वरोरा येथील शहरातील तलावाच्या बाजूला मुख्य रस्त्यावर असलेल्या संग हॉटेलचे संचालक संदीप बालाजी कोहडे यांचे बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावाजवळ गळफास घेवून आत्महत्या केल्याचे प्रेत सापडल्याने वरोरा शहरात एकच खळबळ उडाली असून अतिशय […]

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
वरोरा येथील शहरातील तलावाच्या बाजूला मुख्य रस्त्यावर असलेल्या संग हॉटेलचे संचालक संदीप बालाजी कोहडे यांचे बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावाजवळ गळफास घेवून आत्महत्या केल्याचे प्रेत सापडल्याने वरोरा शहरात एकच खळबळ उडाली असून अतिशय चांगल्या स्वभावाचा माणूस असा कसा आत्महत्या करेन? वरोरा येथील रहिवाशी बल्लारपूर तालुक्यातील वन डेपोत गेला कसा? पोलीस तपासात काय होणार? याविषयी प्रश्न निर्माण होत असून त्यांची हत्त्या की आत्महत्या हे पोलीस तपासा नंतरच कळेल.
बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावात संदीप बालाजी कोहडे (35) यांनी शुक्रवारी सकाळी वन विभागाच्या डेपोमध्ये गळफास लावून आत्महत्या केली असल्याची बातमी असून प्राथमिक तपासात घरगुती वादामुळे आत्महत्या केल्याची बाब समोर येत आहे. मात्र वरोरा येथील व्यक्ती बल्लारपूर इथे येणार कशाला? हा प्रश्न गंभीर असून त्याची हत्त्या की आत्महत्या? बल्लारपूर पोलिसांच्या तपासा नंतर समजणार आहे.