BREAKING NEWS:
चन्द्रपुर

शिक्षकांच्या प्रलंबित समस्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन

Summary

प्रहार शिक्षक संघटना तालुका शाखा ब्रम्हपुरी च्या वतीने गटविकास अधिकारी डॉ. शिरीष रामटेके यांना शिक्षकांच्या विविध समस्याचे निवेदन देण्यात आले.शिक्षण विभागाच्या देयक लिपिक यांच्या कडून शिक्षकांशी अपमानित केल्या जात आहे. त्याना योग्य ती समज देण्यात यावे,मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त प्रभार त्या […]

प्रहार शिक्षक संघटना तालुका शाखा ब्रम्हपुरी च्या वतीने गटविकास अधिकारी डॉ. शिरीष रामटेके यांना शिक्षकांच्या विविध समस्याचे निवेदन देण्यात आले.शिक्षण विभागाच्या देयक लिपिक यांच्या कडून शिक्षकांशी अपमानित केल्या जात आहे. त्याना योग्य ती समज देण्यात यावे,मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त प्रभार त्या शाळेतील सेवाजेष्ठ शिक्षकांना देण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभाराची समीक्षा करून तात्काळ सेवाजेष्ठ शिक्षकाडे देण्यात यावे, ,शिक्षकांचे वेतन वेतनाची रक्कम जिल्हा परिषद कडून प्राप्त होऊन ही वेतन देयके शिक्षण विभागातून उशिराने प्राप्त झाल्यामुळे उशीरा वेतन होत आहेत,जिल्हा परिषद कडून वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर होऊन, त्या वेतन श्रेणी नुसार वेतन मिळत नाही. ,आयकर विवरण पत्राचे फॉर्म न.16 तात्काळ पुरविण्यात यावे. जेणेकरून रिटर्न भरण्यासाठी सोपे होईल, ज्या सेवानिवृत्त शिक्षकाने सेवानिवृत्तीच्या तीन महिन्यापूर्वी भविष्य निर्वाह निधी खाते बंद केलेत त्यांचे अंतिम भुगतान प्रस्ताव जिल्हा परिषद कडे तात्काळ पाठविण्यात यावे. तसेच त्याप्रस्तावासोबत जिल्हा परिषद कडे सादर न केलेले कपातीचे शेड्युल पाठविण्यात यावे,अनेक शिक्षकांचे आजारी रजा, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजूर होऊन त्यांची देयकाची रक्कम मिळत नाही. त्यासाठी जिल्हा परिषद कडे निधी मागविण्यात यावे, फेब्रुवारी 2020 नंतर सेवानिवृत्त, मृत्यू झालेल्या, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, सहा शिक्षक यांच्या व माहे -सप्टेंबर 2021 सेवानिवृत्त पर्यन्तहोणारे शिक्षक यांचे भ. नि. नि. खाते बंद झाल्यामुळे 7 व्या वेतन आयोगाचा 2रा हप्ता रोखीने काढण्यात यावे व जिल्हा परिषद कडे निधीची मागणी करण्यात यावे.7)केंद्र प्रमुख आस्थापना लिपिकाने जिल्हा परिषद कडे भ. नि. नि. कपातीचे शेड्युल पाठविले नाही. त्यामुळे सन 2016 पासून अनेक केंद्र प्रमुख यांचे भ. नि. नि खात्यात रक्कम जमा झाली. तात्काळ भ. नि. नि. शेड्युल पाठविण्यात यावे. 8) जानेवारी 2021 या महिन्यात पदवीधर शिक्षकाच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्तावात अनेक तृट्या होत्या परंतु गटशिक्षणाधिकारी व वरिष्ठ लिपिक यांनी त्या तृट्या पूर्ण केल्यात नाहीत व पुनःश्च त्रुटी पूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद कडे सादर केल्यामुळे, अनेक पदवीधर शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी पासून वंचित राहणार आहेत. ज्या शिक्षकांचे त्रुटी आहेत, त्यांना कळविण्यात यावे व त्रुटी पूर्ण करून परत प्रस्ताव सादर करण्यात यावे, ज्या शिक्षकांना जिल्हा परिषद कडून शैक्षणिक परवानगी मिळाली त्याची नोंद घेण्यात यावी. व ज्यांनी अर्ज केलेत त्यांचे अर्ज जिल्हा परिषद कडे पाठविण्यात यावे. विषय : भ. नि. नि., dcps धारक यांच्या वेतनाचे कपातीचे शेड्युल जिल्हा परिषद कडे उशिरा पाठविण्यात येते, ते तात्काळ पाठविण्यात यावे,वेतनातून कपात झालेल्या रक्कमा या उशिरा पाठविण्यात येतात. त्यामुळे शिक्षकांना नाहक व्याज पडतोय. तात्काळ पाठविण्यात यावे,शिक्षकांना त्यांच्या सेवापुस्तक अद्यावत करण्यासाठी कॅम्प घेण्यात यावे.या सह विविध समस्याचे देण्यात आले. गटविकासअधिकारी डॉ. शिरीष रामटेके यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी अनिल चिलमवार यांना पाचारण करून कारवाई करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी संघटनेचेअरविंद येरणे तालुका अध्यक्ष ,देवानंद तुलकाने तालुका सरचिटणीस,सुरदास कापगते मुख्य सल्लागार,अनंता ढोरे प्रसिध्द प्रमुख,,ईश्वर पिसे उपाध्यक्ष,विजय बोदेले उपाध्यक्ष,गुरुदत्त गणविर,सल्लागार,सौ मिलिंदा नंदेश्वर केन्द्र प्रमुख मुख्य सल्लागार,सुमेध भसारकर केंद्र संघटक व ब्रम्हपुरी तालुका प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *