चन्द्रपुर

वन विभाग प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यावर अंकुश लावावे अन्यथा आम आदमी पार्टी स्वस्थ बसणार नाही :- आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे

Summary

संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चंद्रपूर – दिनांक ०१/१०/२०२१ रोज शुक्रवार ला बाबुपेठ परिसरातील आम्रपाली चौक येथील रहिवासी स्व. श्री सुरेंद्र देवाडकर हे आपल्या काही साथीदार सोबत सोमवार ला जंगलात बांबू आणण्याकरिता गेले असता त्यांना राठोड नावाच्या […]

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….

चंद्रपूर – दिनांक ०१/१०/२०२१ रोज शुक्रवार ला बाबुपेठ परिसरातील आम्रपाली चौक येथील रहिवासी स्व. श्री सुरेंद्र देवाडकर हे आपल्या काही साथीदार सोबत सोमवार ला जंगलात बांबू आणण्याकरिता गेले असता त्यांना राठोड नावाच्या वनकर्मचारी याने अमानुषपणे बेदम मारहाण केले ज्यामुळे त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली,आणि आज पहाटे त्याचा मृत्यू झाला असल्याचे त्याचे परिवारातील लोकांनी तसेच मित्रांनी सांगितले याची बातमी आप चे शहर सचिव यांना मिळताच याची दखल घेत आदमी पार्टी बाबुपेठ ची टीम घटना स्थळी पोहचली. त्यावेळेला पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत शहर सचिव राजु भाऊ कुळे यानी पंच म्हणून सहकार्य केले आणि संबधित दोषी अधिकारी यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टी बाबूपेठ स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका तपास अधिकारी श्री शैलेश जगताप यांना दिली..
तसेच वनरक्षक यांना मारण्याचा अधिकार प्रशासनाने केव्हा पासून दिला याचा जाब विचारायला सुध्दा त्यांच्या कार्यालयात जाऊ असे आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुळे यांनी दिले..
यावेळेला आम आदमी पार्टी चे राजु शंकरराव कुडे, निखील बारसागडे, जयदेव देवगडे, सुजाता बोदेले, कालिदास ओरके, प्रवीण चूनारकर, शंकर भाऊ निखाडे, गगन झोडे, बाबाराव खडसे, शैलेश सोणकुसरे, अंकूश राजूरकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होतें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *