राजुरा तालुक्यातील पांचाळा गावातील गावतलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला तात्काळ द्यावा – राजु झोडे
Summary
राजुरा तालुक्यातील पांचाळा या गावातील शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावांमध्ये गेलेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची जमीन या तलावात गेली त्यांना अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही मोबदला न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती […]

राजुरा तालुक्यातील पांचाळा या गावातील शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावांमध्ये गेलेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची जमीन या तलावात गेली त्यांना अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही मोबदला न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी पुनर्वसन अधिकारी व महसूल अधिकारी यांच्याशी चर्चा करून मोबदला तात्काळ देण्याची मागणी केली.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत ६०.१३ लक्ष रुपये खर्च करून जलसंधारण विभाग चंद्रपूर यांचे मार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात झालेली आहे. सदर तलावाचे बांधकाम सुरु असताना बहुतांशी जमीन सरकारी असल्याचे व पूर्णपणे पडीत असल्याचे सरपंच यांनी प्रशासनास सांगितले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षस्थळी भेट दिली असता ती जमीन काही शेतकऱ्यांची असल्याचे माहिती मिळाली. जमीन गेलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मोबदल्याची मागणी केलेली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मोबदला मिळेल असे आश्वासन दिले होते परंतु अजून पावेतो कोणत्याही प्रकारचा मोबदला सदर शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे जमीन गेलेले शेतकरी हवालदिल झाले असून तात्काळ जमिनीचा मोबदला देण्यात यावा याकरिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात पुनर्वसन अधिक माहिती च्या नेत्रत्वात अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकरीनि पुनर्वसन अधिकारी व महसूल अधिकारी यांच्याशी चर्चा करून मोबदला तातकाढ देण्याची मागणी केली आहे
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….