भ्रष्टाचाराच्या विरोधात आम आदमी पार्टी चा जन आक्रोश आंदोलन आप ने काढली भ्रष्टाचाराची शवयात्रा

चंद्रपूर – चंद्रपूर मधील रस्त्याची दुरावस्था मनपा मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तसेच पेट्रोल डिझेल दर वाढ आणि महागाई च्या विरोधात आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने आज दिनांक १२/११/२०२१ रोजी जन आक्रोश आंदोलन आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे यांचे मार्गदर्शनात शहर सचिव राजु भाऊ कुडे यांच्या नेतृत्वात जूनोना चौक बाबूपेठ येथून गांधी चौक पर्यंत करण्यात आले.
महानगरपालिकेतील २०० कोटीचा भ्रष्ट्राचार, अमृत योजनेच्या नावाने चंद्रपूर मध्ये रस्त्याची केलेली दूर्व्यवस्था तात्काळ दुरुस्त करण्यात यावी..
महागाईने जनता त्रस्त असून भाजपा शासित केंद्र सरकार ने महागाई कमी करावी..
सतत वाढत असलेले पेट्रोल डिझेल चे दरवाढ थांबवली पाहिजे..
राज्य सरकारने आपल्या करातून जनतेला सुट द्यावी..
जनते मध्ये सरकारांच्या विरोधात असंतोष निर्माण झाली आहे. केंद्रात ज्यावेळेला मोदी सरकार आली त्यावेळेला कच्या तेलाची किंमत १०५ डॉलर प्रति बॅरल होते तर देशात पेट्रोल दर ७२ रू लिटर होते.
आता कच्या तेलाची किंमत ८५ डॉलर प्रति बॅरल असताना पेट्रोल ५० रू तर डिझेल ४० रू. लिटर प्रमाणे मिळायला हवे होते परंतु या जुलमी भाजप सरकारने १३ वेळा एक्साईज ड्युटी वाढवून पेट्रोल डिझेल सर्व सामान्य जनतेकरीता महाग करून कंबरड मोडून ठेवले आहे ..
यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही जनतेला समाधान देण्यात निष्क्रीय ठरत असून जनतेच्या पैशातून आपली तिजोरी भरण्यात लागलेली आहे..
यात चंद्रपूर महानगर पालिका प्रशासन सुध्दा लोकांच्या जीवावर उठलेली आहे संपूर्ण चंद्रपूर शहर खड्डेमय करून भ्रष्ट्राचाराने व्यापलेली या भाजप सरकारच्या विरोध करीत आम आदमी पार्टी च्या वतीने भ्रष्टाचाराची अंत्य यात्रा काढण्यात आली..
आंदोलनातील सर्व मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्या तर असेच आंदोलन प्रत्येक झोन मधून जनतेला सोबत घेऊन काढण्यात येईल असे आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांनी माहिती दिली आहे.
यावेळेला जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, शहर सचिव राजु शंकरराव कुडे, युवा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवार, जिल्हा ऑटो रिक्षा अध्यक्ष शंकर भाऊ धुमाले, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, घुग्गुस शहर अध्यक्ष अमीत भाऊ बोरकर, बल्लारपूर शहर कोषाध्यक्ष असिफ भाई, भद्रावती शहर सचिव सुमित हस्तक, बल्लारपूर शहर सचिव ज्योती ताई बाभरे, चंदू माडुरवार, रवींद्र रामटेके, सागर बिऱ्हाडे, अभिषेक सपडी, आशिष पाझारे, उमेश कडू, शमशेर चव्हाण, दिनेश लीपाने, निखिल बारसागडे, अनुप तेलतुंबडे, कोमल कांबळे, कुणाल चन्ने, अजय डुकरे, सुनील पचारे, मयुरी रायपूरे, शारुख शेख, कालिदास ओरके, आशा कदम, दुर्गा शेंडे, सलमा सिद्दीकी, सीमा लोहरे, मीना केशकर, सरिता गुज्जर, रुबिना शेख, आशा नीपाणे, शंकर निखाडे, जयदेव देवगडे, महेश सिंह पाजी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा
न्युज रिपोर्टर
महाराष्ट्र राज्य….