बंडु वाकडे या एका तडफदार कार्यकर्त्याचे निधन. . . !
Summary
बंडु वाकडे या एका तडफदार कार्यकर्त्याचे निधन. . . ! ———————————— सतत सर्वसामान्य माणसांच्या संपर्कात राहून लोकांच्या समस्यांना पत्रकारीतेच्या माध्यमातून वाचा फोडणारे आंबेडकरीय मिशन मध्ये अनेकांना त्यांचा मोठेपणा सिध्द करण्यासाठी स्वत: निस्वार्थपणे झगडणारा, साहीत्य संमेलनातून आपल्या दमदार वक्तृत्व कलेच्या माध्यमातून […]
बंडु वाकडे या एका तडफदार कार्यकर्त्याचे निधन. . . !
————————————
सतत सर्वसामान्य माणसांच्या संपर्कात राहून लोकांच्या समस्यांना पत्रकारीतेच्या माध्यमातून वाचा फोडणारे आंबेडकरीय मिशन मध्ये अनेकांना त्यांचा मोठेपणा सिध्द करण्यासाठी स्वत: निस्वार्थपणे झगडणारा, साहीत्य संमेलनातून आपल्या दमदार वक्तृत्व कलेच्या माध्यमातून सामाजीक प्रश्नांना वाचा फोडणारा रमेशचंद्र राऊत आणि अनिरूध्द वनकर यांच्यासारख्या आज घडलेल्या नेतृत्वाला प्रगतीच्या सर्व वाटापर्यंत पोहचविण्यात सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर आज आपल्यातून निघुन गेलेल्या बंडु वाकडे यांचा होता, पण स्वत:साठी काहीच न मागणारा माझ्या आठवणीतला हा एकमेव कार्यकर्ता. . . ! या सर्व प्रवासातले आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. . . ! !*
*त्याच्या जाण्याने एक सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता आम्ही गमावल्याचे दु:ख आहे.. . . ! ! !*
*त्यांचे जाणे खरेच मणाला लागून जाणारे आहे; त्यांच्या जाण्याने मणातल्या कोपर्यात एक ऊणीव नेहमीकरिता कायम राहील.
🙏💐💐💐💐💐💐🙏
बहुजन समाज पार्टी, जिल्हा चंद्रपूर चे माजी जिल्हाध्यक्ष मा. हंसराजभाऊ कुंभारे यांचेकडून त्यांच्या स्मृतिंना “भावपूर्ण श्रध्दांजली”