चन्द्रपुर

पोंभूर्ण्यात भाजपाचे धरणे आंदोलन व निदर्शने

Summary

पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकार विरोधात पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी धरणे आंदोलन व निदर्शन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपयाने कमी केलेले आहे. मात्र राज्य सरकारने यामध्ये […]

पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकार विरोधात पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी धरणे आंदोलन व निदर्शन करण्यात आले.
केंद्र सरकारने नुकतेच पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपयाने कमी केलेले आहे. मात्र राज्य सरकारने यामध्ये कोणतीही दरवाढ कमी केलेली नाही. करिता महाविकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच तहसिलदारा मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, ओमदास पाल, विनोद देशमुख, बंडू बुरांडे, अजीत मंगळगिरीवार, रूषी कोटरंगे, ईश्र्वर नैताम, मोहन चलाख, दिलीप मॅकलवार, श्वेता वनकर, सुनीता मॅकलवार, रजीया कुरेशी, मनोज रणदिवे, विनोद कानमपल्लीवार, नैलेश चिंचोलकर, जयंत पिंपळशेंडे, चंद्रशेखर झगडकर, दर्शन गोरंतवार, रोशन ठेंगणे, वैभव पिंपळशेंडे, नेहा बघेल, गजानन मुडपुवार, बबन गोरंतवार, तुळशीदास रोहणकर, रंजीत पिंपळशेंडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपा पदाधिकारी, माजी नगरपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, माजी सरपंच, तसेच युवा मोर्चा पदाधिकारी, महिला आघाडी तसेच विविध आघाड्यांनी या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होती.

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा
न्युज रिपोर्टर
महाराष्ट्र राज्य….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *