पोंभूर्णा एमआयडीसीचा मार्ग मोकळा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश
Summary
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. मुबई….. आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या पोंभुर्णा येथील बहुप्रतिक्षित एमआयडीसी प्रकल्पाला गती मिळाली असून, येत्या वर्षभरात सुमारे १५० एकर क्षेत्रात एमआयडीसी रस्ते,वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा पूर्ण करणार आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष माजी अर्थमंत्री […]
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
मुबई….. आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या पोंभुर्णा येथील बहुप्रतिक्षित एमआयडीसी प्रकल्पाला गती मिळाली असून, येत्या वर्षभरात सुमारे १५० एकर क्षेत्रात एमआयडीसी रस्ते,वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा पूर्ण करणार आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज २६ ऑक्टोबर रोजी विधानभवन येथील त्यांच्या दालनात एमआयडीसी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पोंभुर्णा एमआयडीसीचा मार्ग मोकळा केला. त्याचप्रमाणे आदिवासी तरुण, तरुणींनी उद्योजक म्हणून पुढे यावे विशेष जागा आरक्षित करून प्राधान्य देण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच काही प्रमुख उद्योजकांची बैठक घेऊन या एम आय डी सी मध्ये नवीन उद्योग उभरण्याकरिता विनंती करेल असेही सुधिर मुनगंटीवार म्हणाले.