BREAKING NEWS:
चन्द्रपुर

पेट्रोल व डीजल भाववाढ कमी करण्यासाठी भाजपा राजुरा तालुका व शहर च्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

Summary

राजूरा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, […]

राजूरा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे.
मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. आता मोदी सरकारने पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकारनेही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापि, अजूनही राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे. भाजपाशासित राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही, याची नोंद घ्यावी.
राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात.
भाजपा ची मागणी आहे की, महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी.
तसेच, राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोलवरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी.
अशाप्रकारचे निवेदन जी. प. चे सभापती तथा भाजपा तालुका अध्यक्ष राजुरा सुनील उरकुडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार हरीश गाडे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविन्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख्याने माजी आमदार सुदर्शन निमकर, जी. प. सभापति तथा भाजपा तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड़, नगरसेवक राजू डोहे, भाऊराव चंदनखेड़े, जील्हा उपाध्यक्ष भाजयूमो सचिन डोहे, संजय पावडे, सरपंच बाळनाथ वाडस्कर, सचिनसिंह बैस, दिपक झाडे, पुरुषोत्तम लांडे, प्रकाश आस्वले, महादेव हिंगाने, प्रदीप मोरे, राजकुमार भोगावर,अजय राठोड,प्रशांत साळवे, व असंख्य भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा
न्युज रिपोर्टर
महाराष्ट्र राज्य….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *