दिनांक 25/8/ 21 ला जिल्हा परिषद जनपद येथे माननीय डॉ. मिताली शेट्टी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडून शिक्षकांच्या समश्या विषयी शिक्षक संघटना प्रतिनिधि यांना पाचारण करण्यात आले होते.
प्रहार शिक्षक संघटनेतर्फे विनोद लांडगे जिल्हा सरचिटणीस प्रहार यांनी खालील मुद्द्यावर चर्चा करू शिक्षकांचे प्रश्न लावून धरले .
1 शासन निर्णयाप्रमाणे सीएमपी वेतन प्रणाली चालू करण्यात यावी यासाठी संघटनेने आग्रही भूमिका धरली.यानंतर कुठल्याही बँकेचा उल्लेख न करता ज्या शिक्षकांना कोणत्याही बँकेचा लाभ सीएमपी प्रणालीत घेता येईल असे ceo मॅडमनी सांगितले,
2 सर्व्हिस बुक वेतन पळताळणी प्रत्येकतालुक्यातील जिल्ह्यातून 15 सर्विस बुक बोलावून येत्या सहा महिन्यात संपूर्ण सर्व पडताळणी करण्यात येईल याचे आश्वासन मातकर साहेब यांनी सभेस दिले.
3 डीसीपीएस धारकांच्या वेतनातील कपाती मधील फरक आणि त्यांचा हिशोब हे सप्टेंबर महिन्यापर्यंत कॅम्प लावून पूर्ण करण्यात येईल याचे आश्वासन दिले ,
4 आंतर जिल्हा बदलीने इतर जिल्ह्यात बदली झालेल्या शिक्षकांच्या डीसीपी याची कपात झालेली रक्कम व त्यावरील व्याज व त्यांच्या व जिल्हा परिषद शाळा पाठवण्याबाबत सोबतच इतर जिल्ह्यातून आलेल्या डीसीपी धारक याची रक्कम शासनाने सर्व मागण्या बाबत शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येईल याची ग्वाही आदरणीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दिली,
5 उच्चश्रेणी मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी ,जिल्हा परिषद हायस्कूल मधील मुख्याध्यापकाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची कारवाई करण्यासाठी रोस्टर अद्यावत झाल्यानंतर करण्यात येईल असे आश्वासन दिले , प्रभार देत असताना शासन निर्णय याप्रमाणे सेवा जेष्ठ ता नुसार न्याय देण्यात यावा यासाठी सर्व संघटनांनी हा मुद्दा रेटून धरला.
6 ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी शाळेत मुख्याध्यापक पद देतांना जेष्ठ शिक्षकाला डावलून मुख्याध्यापकाचे पद आपल्या मर्जीतील लोकांना देन्यात आले ही बाब अन्यायकारक असून ती सेवा जेष्ठना देण्यात यावी असे ceo मॅडम ना सांगण्यात आले .
7. वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर होऊनाही विषय शिक्षकांची वेतन पडताळणी न झाल्यामुळे वरिष्ठ वेतन चे लाभ मोडण्यासाठी लवकर सर्व्हिस बुक पळताळणी साठी पाठवावे याबाबत पाठपुरावा केला. सेवानिवृत्त व मयत शिक्षकांना त्यांचे लाभ सेवानिवृत्ती प्रकरण, उपदान, पेन्शन विक्री, गटविमा ,भविष्य निर्वाह निधी उशिराने प्राप्त होत असल्यामुळे होत आहे हे ceo मॅडमला समजावून दिल्यानंतर मॅडम नी याबाबत असे होणार नाही याची ग्वाही दिली. शिक्षकाच्या सगळ्या समस्या लवकरात लवकर मिळवून मिळण्यासाठी संबंधित प्रमुखांना तशा सूचना दिल्या. सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन पडताळणी ही सहा महिन्यापूर्वीच व्हावे ही संघटनेची मागणी मान्य केली, आजारी रजा प्रकरणात वारंवार त्रुटी काढीत असल्यामुळेअनेक प्रकरण प्रलंबित असतात त्यामुळे जिल्हा परिषद कडे आलेले सगळे प्रकरणांना टोकन नंबर देऊन त्यानुसारच त्यावर ती कारवाई करावी असे आदेश ceo मॅडम यांनी दिले,शैक्षणिक परवानगीचे अधिकार व प्लॉट खरेदीची परवानगी गट विकास अधिकारी यांना देण्यात यावी अशा सूचना ceoमॅडम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली , बी एड करून शासनाची व जिल्हा परिषदेची फसवणूक करण्यात आली या यासंदर्भात शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या अहवालानुसार त्यांच्यावर ती कारवाई करावी व पदवीधर वेतनश्रेणी काढून घेण्यात यावी असे प्रहार संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे मागणी केली,तीन वर्षापेक्षा थकबाकी वेतन यांच्या देकास विलंब झाल्यामुळे लेखा आक्षेप घेण्यात येते ते पंचायत समितीच्या मासिक सभेत ठेवले जाते परंतु काही कारणास्तव पंचायत समिती मासिक सभेत मंजुरी मिळत नाही आणि म्हणून पर्यायाने माननीय मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी त्यासाठी लागणारी परवानगी देण्याचे मान्य केले , covid-19 सेवा देत असताना मृत्यू झालेल्या शिक्षकांचे 50 लाख विमा योजना प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच शासनाकडे पाठविल्याचे आदरणीय शिक्षण अधिकारी यांनी सांगितले. सदर सभेला जिल्ह्यातील सर्व संघटनांचे अध्यक्ष/ सचिव यापैकी एक सदस्य उपस्थित होते. सर्वांच्या सामान्य समस्या वरती चर्चा न होता त्या समस्या निकाली काढण्यासाठी माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आश्वासन दिले. या सभेला मा.मुख्य कार्यपालन अधिकारी सोबत, श्याम वाखर्डे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अशोक मातकर मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, उल्हास नरड शिक्षणाधिकारी माध्य. दीपेंद्र लोखंडे शिक्षणाधिकारी प्राथ. उपस्थित, अधीक्षक कक्ष अधिकारी आणि कर्मचारी ऊपस्तिथ होते.
विनोद लांडगे
जिल्हा सरचिटणीस प्रहार शिक्षक संघटना चंद्रपूर