BREAKING NEWS:
चन्द्रपुर

“डॉक्टर्स डे” उत्सवा निमित्य सेवा सप्ताह कार्याची सुरवात डॉक्टरांनी हिर-हिरीने सहभागी व्हावे – आयएमए अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आयएमए चंद्रपूर चा उपक्रम

Summary

चंद्रपूर – येत्या 1 जुलै रोजी राष्ट्रीय “डॉक्टर्स डे” मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्याने चंद्रपूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टर्स डे च्या निमित्याने विविध प्रकारचे उपक्रम चंद्रपुरात राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये रोगनिदान शिबीर, वृध्दाश्रमाना भेटी देणे, कोरोनाच्या […]

चंद्रपूर –
येत्या 1 जुलै रोजी राष्ट्रीय “डॉक्टर्स डे” मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्याने चंद्रपूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टर्स डे च्या निमित्याने विविध प्रकारचे उपक्रम चंद्रपुरात राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये रोगनिदान शिबीर, वृध्दाश्रमाना भेटी देणे, कोरोनाच्या संकटात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टर कुटुंबाला भेटी देणे व रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून कान, नाक, घसा तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तापासनी, दंतरोग तपासनी या सारख्या तपासणी करण्यात येणार आहे. आज या सेवा कार्याच्या उपक्रमाची सुरवात चंद्रपुरातील वाहतूक पोलीस निरीक्षक कार्यालयातून करण्यात आले यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, पोलीस उपअधीक्षक (गृह) शेखर देशमुख यांची उपस्थिती होती. त्यावेळी चंद्रपूर आय.एम.ए. शाखेचे अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी या सामाजिक उपक्रमात डॉक्टरांनी सहभागी होऊन हिर-हिरीने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी सदर कार्यक्रमाला इंडियन डेंटल असोसीएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण घोडे, आय.एम.ए चंद्रपूरचे सचिव डॉ. अनुप पालीवाल, इंडियन डेंटल आसोसीएशनचे सचिव आशिष गजभे, आय.एम ए. चंद्रपूरचे कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण पंत, महिला शाखेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा घाटे, महिला शाखेच्या सचिव डॉ. नगीना नायडू, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ.प्रसन्न मद्दीवार, डॉ.अमित देवईकर, डॉ.अभिषेक दीक्षित, डॉ.कुणाल कापर्तीवार, डॉ.उमेश अग्रवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. आशिष वरखडे, डॉ.सुधीर रेगुंडवार, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ.करुणा रामटेके, डॉ. प्रीती चौहान यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *