ज्ञानदा रामकृष्ण धोटे रजत पदकासह सहा पुरस्काराने सम्मानित नागपूर विद्यापीठाने केले सन्मानीत
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
राजुरा येथील ज्ञानदा धोटे हिने आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत 2018-19 च्या पदवीदान समारंभात एक दोन नव्हे तर चक्क सहा बक्षिसांचे घवघवीत यश संपादन केले. तिला मिळालेल्या पुरस्कारामधे श्री शांती रंगराव मेमोरियल सिल्वर मेडल, जॉग्राफीसाठी बी.ए.अंतिम वर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, श्रीमती अनुराधा तांबे स्मृती चषक, भूगोल साठी, रा.तू नागपूर विद्यापीठ, डाँ स. अय्यंगार स्मृती पारितोषिक इकॉनॉमिक्स सर्वाधिक गुणसाठी. रा, तू म. नागपूर विद्यापीठ., श्रीमती लिलाबाई केशव खाकरे स्मृती पारितोषिक अर्थशास्त्र सर्वाधिक गुणासाठी, श्री हरिभाऊ पाळणीतकात स्मृती पारितोषिक अर्थशास्त्र सर्वाधिक गुणासाठी, अलंपल्लम श्रीरण नारायण स्मृती पारितोषिक इकॉनॉमीक्स सर्वाधिक गुणासाठी रा.तू.म. नागपूर विद्यापीठ. ज्ञानदाला हे सर्व पारितोषिक घोषित झाले आहे.
ज्ञानदा ने एल.ए. डी. महाविद्यालयातुन बी.ए. ची पदवी विशेष गुणवत्ते सह मिळविली आहे. जपानि भाषा शिकत असलेली ज्ञानदा उर्फ पूर्वा सद्या दिल्ली विद्यापीठात ईस्ट एशियन स्टडीज मधे पदवीत्तर शिक्षण घेत आहे.
राजुरा येथे न्यू इरा इंग्लिश स्कुल व नंतर स्टेला मेरिस कॉन्व्हेंट आणि बनवारी लाल पुरोहित बी.व्ही.एम भवन्स शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शांत, संयमी आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेली ज्ञानदा उत्तम वक्ता आहे व अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय छात्र संसद ती सतत गाजवत असते. अनेकदा तिने विद्यापीठ प्रतिनिधींत्व केलेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मधे तिचे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत.
ज्ञानदा स्व. ऍड. राम धोटे व धोटे आणि ड्रॉयव्हीग स्कुलच्या संचालिका तथा इंफॅन्ट जीजस येथील शिक्षिका मेघा धोटे यांची जेष्ठ कन्या आहे.
विद्यापीठ विभाग प्रमुख डॉ. दीपाली चहांदे, डॉ. रोझलीन मिश्रा, तसेच प्रिन्सीपाल दीपाली कोतवाल आणि प्राध्यापक वृंद यांनी तिच्या यशाचे भरभरुन कौतुक केले आहे.