चन्द्रपुरातील वडगाव येथे एका व्यक्तिने स्वतःला गळफास लावला
चन्द्रपुर:- वडगाव येतील एका व्यक्तिने स्वताला गळफास घेतला, मृत व्यक्तीचे नाव मंगेश ठाकरे वय (35) या व्यक्तिने ता.16 शुक्रवार या दिवशी बकरा कापन्यात आला . आणि ता.17 शनिवार या दिवशी मृत व्यक्तिने दारू पिऊन स्वतःची पत्नी प्रतिभा ठाकरे आणि सासु यांच्यासोबत दारू पिऊन झगला केला पत्नीला मारहाण केली. ता.18 रविवार या दिवशी मृत व्यक्ति दिवसभर दारू पिऊन होता आणि रात्रि 9 ते 10 च्या सुमारास त्या मृत व्यक्ति मंगेश ठाकरे याने सिलिंग पंख्याला दोर बांदुन स्वतःला गळफास घेतला. मृत व्यक्ति शेखर वाढई यांच्या घरी किरायने राहत होता. ता. 19 सोमवार च्या रात्रि गावातील त्या घराच्या आजुबाजुच्या लोकांना वास आली आणि त्यांनी खिडकीतून डोकाउंन बघितले तर मृत व्यक्ति मंगेश ठाकरे याने स्वतःला गळफास लावलेला दिसला, गावातील लोकांनी रामनगर पोलिस स्टेशन ला तक्रार केली आणि रामनगर पोलीस स्टेशन ची टीम रात्रि सुमारे 1 वाजता दाखल झाली आणि पंचनामा करुण मृत व्यक्तीला सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम साठी पाठवन्यात आले. मृत व्यक्तिने स्वतःला गळफास का लावला हे अजूनही उघडकिस यायचे आहे .
पुढील तपास रामनगर पोलीस ची टीम करीत आहे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा न्यूज रिपोर्टर
महाराष्ट्र राज्य
चन्द्रपुर प्रतिनिधि