चंद्रपूरमध्ये सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की.
Summary
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चंद्रपूर:- शहरातील तुकूम प्रभागात २०१८-१९ या वर्षातील निधीतून मंजूर करण्यात आलेल्या शिवनेरी मैदानावर स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले. मात्र याला विरोध करीत कार्यक्रमात इंटक युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी कार्यकर्त्यांसह […]
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
चंद्रपूर:- शहरातील तुकूम प्रभागात २०१८-१९ या वर्षातील निधीतून मंजूर करण्यात आलेल्या शिवनेरी मैदानावर स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले.
मात्र याला विरोध करीत कार्यक्रमात इंटक युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी कार्यकर्त्यांसह गोंधळ घातला. तेव्हा यावेळी भाजप व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
मनपातील तुकूम प्रभाग क्रमांक १ मध्ये २०१८-१९ या वर्षात हंसराज अहिर यांच्या खासदार निधीतून मंजूर करण्यात आलेले शिवनेरी मैदानावर सावरकर व्यायामशाळेचे लोकार्पण अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. २६ लाख रुपये खर्चून येथील व्यायामशाळा बांधण्यात आली.पण या कार्यक्रमात प्रशांत भारती यांनी कार्यकर्त्यांसह गोंधळ घातला. शिवनेरी हे नाव असताना वीर वि.दा. सावरकर नाव देण्याची गरज नाही असे म्हणत भारती यांनी विरोध केला. यावेळी भाजप व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. अहिर यांनी मैदानातील व्यायामशाळेचे नाव सावरकर असले तरी मैदानाचे नाव शिवनेरीच कायम राहील असे स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांना याचा फायदा होईल असेही त्यांनी नमूद केले.