आरक्षणाकरिता बसपाचे जिल्हास्तरिय धरणे आंदोलन
बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने अनु जाती. अनु. जमातीच्या पदोन्नती व ओबीसीच्या आरक्षणासाठी दि. 13/07 2021 ला दुपारी 12 वाजता चंद्रपूर जिल्हा कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. तरी बामसेफ, बी व्ही एफ., बी एस पी., महिला आघाडी च्या सर्व जिल्हा, विधानसभा, सेक्टर बूथच्या पदाधिकारी व कार्यकर्ते हितचिंतकांनी होणाऱ्या जिल्हास्तरीय आंदोलनास बहुसंख्येनी वेळेवर उपस्थित राहण्याचे करावे, असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुक्कदर मेश्राम यांनी केले आहे.