आता महापालिका निवडणुकांसाठी तीन सदस्यीय प्रभाग
संदीप तुरक्याल
चंद्रपुर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य
चंद्रपूर – पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग पध्दत असणार की एक सदस्यीय वार्ड यावर ठाकरे सरकारने निर्णय जाहीर करीत महानगरपालिका निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पध्दतचं असणार असे जाहीर केले.
मुंबई महानगरपालिका सोडून राज्यातील इतर महानगरपालिकेत 3 सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक होणार आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. ऐन वेळेवर सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते, असं राजकीय पक्षांचं मत होतं. दरम्यान, शहरांचा विस्तार वाढल्यानं सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असं झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभाग रचना केली जाण्याची शक्यता असते.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.