अ.भा.रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाचा धसका घेत, प्रशासनाने पारधी समाजाच्या मागण्या केल्या मान्य
Summary
मंगळवेढा-:पारधी समाजाला न्याय न मिळाल्यास अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या तीव्र आंदोलन करणार असल्याच्या इशाऱ्याचा धसका घेत प्रशासनाने पारधी समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत .सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर पासून शिधापत्रिका धारक पारधी समाज बांधवांना स्वत धान्य दुकानातून धान्य मिळावे .२) […]

मंगळवेढा-:पारधी समाजाला न्याय न मिळाल्यास अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या तीव्र आंदोलन करणार असल्याच्या इशाऱ्याचा धसका घेत प्रशासनाने पारधी समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत .सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर पासून शिधापत्रिका धारक पारधी समाज बांधवांना स्वत धान्य दुकानातून धान्य मिळावे .२) पारधी समाजातील सर्व व्यक्तिंना जातीचे दाखले देण्यात यावेत. 3) पारधी समाज राहत असलेल्या ठिकाणी शिबीर आयोजित करून सर्वांना आधार कार्ड देण्याची व्यवस्था करावी आदि मागण्यांकरिता मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या या दोन दिवसा मध्ये पारधी समाजाच्या मागण्या योग्य व न्याय असून त्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी याकरिता पक्षाचे प्रदेश सचिव डी.के.साखरे व सोलापुर जिल्हा महिला अध्यक्षा पद्मिनी शेवडे यांनी तहसील प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले त्यामुळे तहसीलदार स्वप्निल रावडे यांना आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करणे भाग पडले.
पारधी समाजाला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा डी.के.साखरे यांनी दिला होता. याचा धसका घेऊन तहसील प्रशासनाने आंदोलनकर्त्या पारधी समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून पंधरा दिवसात त्यांची पूर्तता करण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.
निवासी नायक तहसीलदार सुधाकर धाईंजे यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र दिले. यावेळी प्रदेश सचिव डी.के.साखरे, जिल्हा महिला अध्यक्षा पद्मिनी शेवडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी, ह.भ.प.ताई महाराज मंगळवेढेकर ,रविंद्र काळे, बबन काळे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.