चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना

गोंदिया– तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचे कारण समजले नसून तिरोडा पोलीस तपास करीत आहे. मृतकामध्ये रेवचंद डोगरु बिसेन (वय 51), मालता रेवचंद्र बिसेन (वय 45), पूर्णिमा रेवचंद बिसेन (वय 20), तेजस रेवचंद बीसेन (वय 17) या चौघांचा समावेश आहे.