वृध्दाश्रमातील वृध्दांची आरोग्य तपासणी — स्पंदन फाऊंडेशनचा पुढाकार
गडचिरोली- एक हात मदतीचा या ऊपक्रमांर्तगत स्पंदन फाउंडेशनचे सदस्य डॉ. सुरेश लडके यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली येथे स्पंदन फाऊंडेशन, श्री चिंतामणी क्लिनिक, डॉ. बोदेले डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने वृध्द आजी आजोबांची आरोग्य तपासणी, रक्त तपासणी , दंत तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णांना मोफत ओषध, टूथब्रश व पेस्ट देण्यात आले.यावेळी प्रामुख्याने मधुमेह तज्ञ डॉ. पंकज सकिनालवार ,डाॅ.दिप बदोले,सिटी पॅथालाॅजीच्या डॉ. प्रिया सकिनालवार व स्पंदन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे यांचेतर्फे वृध्दांची तपासणी करण्यात आली.
वाढदिवसाचे औचित्य साधून
मातोश्री वृद्धाश्रम येथे डॉ. सुरेश लडके यांच्या तर्फे वृद्धाश्रमास दैनंदिन नित्योपयोगी गरजेचे सामान उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवाजी सोनटक्के , सचिव सुनिल पोरेड्डीवार , सामाजीक कार्यकर्ते दादाजी चुधरी, प्रा. देवानंद कामडी,पत्रकार शेमदेव चापले,अभियंतागण राजेंद्र ऊरकुडे,पांडुरंग नागापुरे,पुरूषोत्तम वंजारी,अंनिसचे सरकार्यवाह विलास निंबोरकर,प्रज्ञा संस्कार काॅन्व्हेंटचे मुख्याध्यापक चेतन गोरे,शिक्षकवृंद सुमित मशाखेत्री,आशिष ढोले,सुरज बोम्मावार,राहूल मडावी,प्रतीक नैताम,संजीवनी विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेश चुटे,शिक्षक प्रवीण रामगिरवार ,वृध्दाश्रमाचे कर्मचारी गंगाधर चंदावार उपस्थित होते.
प्रा शेषराव येळेकर
सह. संपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क