लॉयन्स क्लब गडचिरोली आणि पोलिस योद्धा न्युज नेटवर्क ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिं.30 ऑक्टोबर 2021 ला गीत गायन स्पर्धा विजेते, पिस पोस्टर चित्रकला स्पर्धा विजेते आणि कोरोना योद्धा ह्यांचा सत्कार कार्यक्रम सेलिब्रेशन फंक्शन हॉल येथे पार पडला.
Summary
ह्यावेळी लॉयन्स क्लब च्या अध्यक्षा लॉ. परविन भामानी,कार्यक्रमाचे उद् घाटक राजकुमार खोब्रागडे, प्रमुख अतिथि गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तसेच लॉयन्स क्लब च्या माजी अध्यक्षा लॉ. प्रा. संध्या येलेकर, झोन चेअरपर्सन लॉ. शेषराव येलेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉ. संध्या चिलमवार, […]
ह्यावेळी लॉयन्स क्लब च्या अध्यक्षा लॉ. परविन भामानी,कार्यक्रमाचे उद् घाटक राजकुमार खोब्रागडे, प्रमुख अतिथि गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तसेच लॉयन्स क्लब च्या माजी अध्यक्षा लॉ. प्रा. संध्या येलेकर, झोन चेअरपर्सन लॉ. शेषराव येलेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉ. संध्या चिलमवार, प्रास्ताविक लॉयन्स क्लबच्या सचिव लॉ.मंजुषा मोरे तर आभार प्रदर्शन क्लबचे कोषाध्यक्ष लॉ. महेश बोरेवार ह्यांनी केले.
मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन लागल्यानंतर लोकांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. दोन ते तीन महिण्याच्या कालावधीत बरेच जण हाती काम नसल्यामूळे बेरोजगार झाले व परिवाराच्या पोषणाची चिंता सतावू लागली. अशा गरजू परिवारासाठी काही मदत करता येईल का?, याचा विचार लाॅ. सुरेश लडके यांनी इतर लाॅयन सदस्यां समोर तसेच महावितरणच्या अभियंत्यांसमोर मांडला व त्याला महावितरण मधील अभियंते पुरुषोत्तम वंजारी,विनोद कोल्हटवार ,संतोष रुद्रशेट्टी,प्रफूल्ल पिंपळकर,लक्ष्मीकांत पुट्टावार व महावितरणातील इतर अभियंते,कर्मचारी व लाईन स्टाफ ह्यांनी प्रतिसाद देत जवळपास २६५ गरजू कुटूंबाना अन्न धान्य देऊन मदत केली.तसेच कोरोनाच्या दुसर्या लाटेत महेंद्र ब्राम्हणवाडे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी रजनीकांत मोटघरे, गौरव एनप्रेड्डीवार , संजय चन्ने ह्यांनी सतत ५५ दिवस रुग्णांच्या नातेवाईकांना दुपारचा चहा,व दोन वेळचे जेवण दिले.
या कोरोना योद्ध्यांचा पोलिस योद्धा न्युज नेटवर्क तर्फे कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच लॉयन्स क्लब चे सदस्य लॉ. डॉ. सुरेश लड़के, लॉ. मदत जिवाणी, लॉ. संध्या येलेकर, लॉ. शेषराव येलेकर, लॉ. सतिश पवार, लॉ. महेश बोरेवार, लॉ. देवानंद कामडी, लॉ. शालिनी कुमरे, लॉ. परविन भामानी, लॉ. गिरीश कुकडपवार, लॉ.शेमदेव चापले, लॉ. शांतीलाल सेता, लॉ. नविनभाई उनाडकात, लॉ. सुनिल देशमुख, लॉ. भुजंग हिरे, लॉ. मंजुषा मोरे, लॉ. रहीम दोढिया, लॉ. सविता सादमवार ह्यांचा देखील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून पोलिस योद्धा न्युज नेटवर्क तर्फे सत्कार करण्यात आला.
तसेच *गीत गायन स्पर्धा* यातील *गट अ* मधील पहिला क्रमांक स्निगधी राऊत, दुसरा क्रमांक त्रिज्या पेटकर,तिसरा क्रमांक अमित पावडे, *गट ब* मधील पहिला त्रीवेणी नागमोती , दुसरा प्राची बांगरे, तिसरा दिक्षा वाळके, *गट क* मधील पहिला नयन नागमोती, दुसरा अपर्णा दर्डे , तिसरा चैतन्य गौरकार, *गट ड* मधील पहिला जिगणा शाह, दुसरा राजेश धोंगडे, तिसरा समीर हिराणी आणि हेमंत पेटकर हे विजेते होते तर *पिस पोस्टर चित्रकला* स्पर्धेतील 11 ते 13 वयोगटातील विध्यार्थ्यांना *एकात्मता* ह्या विप षयावर चित्र काढायची होती त्यात पहिला क्रंमाक श्रावणी राक्षसभुवनकर, दुसरा क्रंमाक देबोश्री गायली, तिसरा क्रंमाक साची उंदिरवाडे ह्या सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला लॉ. नादिरभाई भामानी, लॉ. डॉ. सुरेश लड़के, लॉ. भुंजग हिरे, लॉ.मदत जिवाणी,लॉ. दिपक मोरे, लॉ. सुनिल देशमुख, लॉ. गिरीश कुकडपवार,लॉ. डॉ. अरुणप्रकाश, लॉ. शेमदेव चापले, लॉ. संजय बारापात्रे, लॉ. किशोर चिलमवार, लॉ. शालिनी कुमरे, लॉ. रजनी हिरे,लॉ. कविता बारापात्रे,लॉ. निलिमा देशमुख,लॉ. वंदना चापले, लॉ. ममता कुकडपवार, लॉ. नितिन चेंबुलवार, लॉ. सपना बोरेवार तसेच पोलीस योध्दा चॅनलचे सदस्य व महावितरणचे अभियंते पुरूषोत्तम वंजारी, कोल्हटवार,प्रफूल्ल पिंपळकर,लक्ष्मिकांत पुट्टावार उपस्थित होते.