लायन्स क्लब तर्फे नवजात शिशू नां मच्छरदाणी व बेबी बेडचे वितरण
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदिसह विविध क्षेत्रात कामे करणाऱ्या लॉयन्स क्लब गडचिरोली या संघटनेतर्फे आरोग्य उपक्रमा अंतर्गत स्थानिक महिला व बाल रुग्णालय येथे ३० मच्छरदानी व बेबी बेड चे वितरण १५ ऑगष्ट २०२१ रोज रविवारला करण्यात आले.
याप्रसंगी लॉयन्स क्लब च्या नव नियुक्त अध्यक्ष लॉ. परवीन भामानी, माजी अध्यक्ष लॉ. संध्या येलेकर, सचिव लॉ. मंजुषा मोरे , कोषाध्यक्ष लॉ. महेश बोरेवार, झोन चेअरपर्सन लॉ. शेषराव येलेकर, कॅबिनेट सदस्य लॉ. नादीरभाई भामानी, लॉ. सतिश पवार,लॉ. मदत जीवानी, लॉ. भुजंग हिरे, लॉ. डॉ. सुरेश लडके, लॉ. देवानंद कामडी,, लॉ.संजय भांडारकर,लॉ प्रविण मिरगे, लॉ. किशोर चिलमवार, लॉ. संजय बारापात्रे, लॉ. नितीन चंबुलवार, लॉ. शालिनी निंबार्ते, लॉ. स्मिता लडके,लॉ. रजनी हिरे, लॉ. निलिमा देशमुख,लॉ. प्राजक्ता मिरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवजात शिशुंचा मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया सारख्या रोगाच्या संक्रमणापासून बचाव व्हावा, या उद्देशाने लॉयन्स क्लब च्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डॉ. दिपचंद सोयाम यांनी लॉयन्स क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले. लॉयन्स क्लबच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम राबविणार असल्याचे मानस अध्यक्ष लॉ. परवीन भामानी यांनी व्यक्त केले.
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी शेषराव येलेकर