लायन्स क्लबच्या वतीने वृक्षारोपण

पर्यावरण संतुलन जागृती या उपक्रमाअंतर्गत तसेच प्रांत 3234 चे प्रांतपाल लॉ राजेंद्रसिंह बग्गा यांच्या 50 व्या जन्मदिनानिमित्त, गडचिरोली- नागपुर रोड लगत गोगाव येथील शेतात विविध फळे व सावली देणाऱ्या गुलमोहर, केशिया, बाबूल, चिक्कु, नीम, लेमन आवला, इत्यादी प्रजातीच्या ५० वृक्षांचे वृक्षारोपण गडचिरोलीच्या नगराध्यक्षा सौ योगिता पिपरे, प्रांताचे विभागीय अध्यक्ष लॉ शेषराव येलेकर, कॅबिनेट सदस्य लॉ नादिर भामानी, लॉ मदत जीवानी यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा लॉ परविन भावानी यांनी वर्षभरात विविध टप्प्यात ५०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचे व ते जगविण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे, प्रत्येक लॉयन सदस्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी १० झाडे लावावीत असे आवाहन सुद्धा त्यांनी याप्रसंगी केले. नगराध्यक्षा योगिता पीपरे यांनी या उपक्रमासाठी नगरपरिषद गडचिरोलीच्या वतीने शक्य ती मदत करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.
यावेळी लॉयन्स क्लब च्या सचिव लॉ मंजुषा मोरे,यांनी उपस्थित लॉयन्स सदस्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष लॉ महेश बोरेवार, लॉ सतीश पवार, लॉ संध्या येलेकर, लॉ दीपक मोरे, लॉ डॉ. सुरेश लडके, लॉ देवानंद कामडी, लॉ गिरीश कुकुडपवार , लॉ ममता कूकुडपवार, लॉ शांतीलाल सेता , लॉ सुधा सेता , नितीन चंबुलवार, अशोक फुकाटे, प्रा. गौरव निंबार्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
शेषराव येलेकर
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी