लायन्स क्लबच्या वतीने ग्रामस्थांना मास्क, टूथ ब्रश, टूथपेस्टचे वितरण व आरोग्यविषयक मार्गदर्शन.
लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने रेखा टोला या दुर्गम आदिवासी गावात जाऊन तेथील शालेय विद्यार्थी, युवक व ज्येष्ठ नागरिकांना कोरोना पासून सतर्क राहण्यासाठी मास्क चा वापर नियमित करणे तसेच तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहण्याचे आव्हान करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थी, युवक व ज्येष्ठांना लायन्स क्लबच्या वतीने मास्क, टूथब्रश व टूथपेस्टचे वितरण करण्यात आले.
जिल्हास्तरीय व इतर संस्थांच्या 2012- 13 च्या सर्वेक्षणानुसार विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासह यवतमाळ, अमरावती ,चंद्रपूर व नंदुरबार या जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांपासून तर वृद्धापर्यंत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनाचे प्रमाण 65 टक्के पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवना सोबतच तंबाखूजन्य पदार्थ मिश्रित दंतमंजन, टूथपेस्ट, मशेरी, व तपकीर चा वापर दात घासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेड्यापाड्यात होताना या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात लहान मुलांपासून तर मोठ्या पर्यंत मुखाचे व फुपुसाचे कर्करोग दंतरोग तसेच विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता वाढताना दिसत आहे. लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने दरवर्षी आरोग्य उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात जाऊन आरोग्य विषयक जनजागृती, व आरोग्य उपचार शिबिरे घेतली जातात या वर्षीसुद्धा नुकतेच आरोग्य उपक्रमा अंतर्गत लॉयन्स क्लब गडचिरोली च्या वतीने रेखाटोला, या दुर्गम व आदिवासी गावात जाऊन 50 लोकांना मास्क, टुथब्रश आणि टुथपेस्ट चे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. सुरेश लडके, प्रा. संध्या येलेकर, व लायन्स क्लबच्या अध्यक्ष परविन भामानी यांनी उपस्थितांना तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरापासून शरीरावर होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले तसेच या पदार्थापासून दूर राहण्याचे तसेच कोरोना पासून सतर्क राहण्यासाठी नियमित मास्क व वेळोवेळी हात स्वच्छ ठेवण्याचेआवाहन याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे संचालन सतीश पवार यांनी तर उपस्थितांचे आभार सचिव मंजुषा मोरे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास,कोषाध्यक्ष महेश बोरेवार, झोन चेअर पर्सन शेषराव येलेकर, कॅबिनेट सदस्य नादीरभाई भामानी, लायन्स क्लबचे सदस्य गिरीश कुकडपवार, ममता कुकडपवार, सुचिता कामडी, स्मिता लडके, आश्रमशाळा, चांदाळा च्या मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी मॅडम रेखाटोला गावातील विद्यार्थी, युवक ज्येष्ठ महिला व पुरुषआदि मोठ्या संख्येने उपस्थित होते .