BREAKING NEWS:
गडचिरोली

महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत तारुण्याच्या उंबरठ्यावर या विषयावर लॉ. माणिक ढोले ह्यांच मार्गदर्शन

Summary

“लायन्स विश्व सेवा सप्ताह ऑक्टोंबर 2 ते 8 अंतर्गत” समारोपाच्या शेवटच्या दिवशी महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत “तारुण्याच्या उंबरठ्यावर ” या विषयावर लॉ. माणिक ढोले ह्यांनी इयत्ता 8,9 आणि 10 वी च्या शासकीय इंग्लिश माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले, त्यांनी आपल्या मनातील […]

“लायन्स विश्व सेवा सप्ताह ऑक्टोंबर 2 ते 8 अंतर्गत” समारोपाच्या शेवटच्या दिवशी महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत “तारुण्याच्या उंबरठ्यावर ” या विषयावर लॉ. माणिक ढोले ह्यांनी इयत्ता 8,9 आणि 10 वी च्या शासकीय इंग्लिश माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले, त्यांनी आपल्या मनातील नकारात्मक विचार काढुन सकारात्मक विचार कसे आणता येईल तसेच आपल मन व शरीर कशाप्रकारे शुद्ध ठेवता येईल आणि आपल्या मनासाठी ,माणिक ढोले यांनी स्वतः तयार केलेला ए बी सी डी चा मंत्र विद्यार्थिनींना दिला तो म्हणजे Avoid Gossips,Be a positive,Cancel Complaint Count,Desire and Determination. Good touch आणि Bad Touch बद्दल सांगितल आणि कुठेतरी मनाचं ब्युटीपार्लर असायला हवं असं मनोगत व्यक्त केलं.ह्या कार्यक्रमाचे संचालन लॉयन्स क्लबच्या सचिव लॉ.मंजुषा मोरे ह्यांनी केले तर आभारप्रदर्शन लॉ. संध्या येलेकर ह्यांनी केले.ह्यावेळी शासकीय इंग्लिश माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डी. एच.जुमनाके आणि शिक्षकवृंद प्रतिभा बनाईत आणि एस.एस.मोडक तसेच लॉयन्स क्लबच्या अध्यक्षा लॉ. परवीन भामाणी, सचिव लॉ. मंजुषा मोरे,लॉ. शालिनी निबांर्ते आदि सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *