ज्येष्ठ नागरिक व गरजूंसाठी मधुमेह व इतर रोग तपासणी शिबिर संपन्न
प्रा शेषराव येलेकर/गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारत देश ओळखला जातो. आपल्या भारत देशात मधुमेहाची संख्या खुप जास्त आहे. पूर्वी मधुमेह म्हटलं की लोक घाबरून जायचे,आताही घाबरतातच पण त्यामानाने आता बर्यापैकी समाजात जागरुकता निर्माण झाली आहे. तरी काही गोष्टी अशा आहे की आजही सामान्य लोकांना माहिती नाही. त्याकरिता विश्व सेवा सप्ताह ऑक्टोंबर 2 ते 8 अंतर्गत लायन्स क्लब व जेष्ठ नागरिक संस्था जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिक व मधुमेह ग्रस्तांसाठी 7 आक्टोंबर 2021 रोज गुरुवारला ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, गडचिरोली येथे मधुमेह तपासणी व मार्गदर्शन तसेच इतर रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये डॉ. राज देवकुले,जनरल फिजिशियन व मधुमेह कन्सल्टंट यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले, तसेच जनरल हॉस्पिटल ची टीम मेडिकल ऑफिसर डॉ. भुषण लायबर, एन सी डी चे जिल्हा सल्लागार डॉ. नंदु मेश्राम, दंत आरोग्यक रिता मेश्राम, नेत्र चिकित्सा अधिकारी मेघा ठेंगणे,स्टाफ नर्स शिल्पा मेश्राम व प्रणाली ठेंगणे ह्यांनी ज्येष्ठ नागरिकांची व गरजुंची डोळ्याची तपासणी, दंत तपासणी, एनसीडी तपासणी, कुष्ठरोग तपासणी केली.या शिबीरात 123 ज्येष्ठ नागरिकांनी तसेच गरजूंनी या संधीचा लाभ घेतला. ह्यावेळी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, उपाध्यक्ष सत्यवान वाळके, सचिव सुधाकर बावणे आणि ज्येष्ठ नागरिक संस्था सदस्य तसेच लायन्स क्लब गडचिरोली च्या अध्यक्ष लॉ परवीन भामाणी , सचिव लॉ.मंजुषा मोरे, कोषाध्यक्ष लॉ.महेश बोरेवार, लॉ.सुचिता कामडी, लॉ.नविनभाई उनाडकाट, लॉ नादिरभाई भामाणी, लॉ. देवानंद कामडी, लॉ. मदत जिवानी, लॉ. सतिश पवार, लॉ. शेमदे चापले, लॉ. नितिन चेंबुलवार, लॉ. दीपक मोरे, लॉ. डॉ. सुरेश लडके, लॉ. शालिनी निंबार्ते, लॉ. दिलीप सारडा आदी सदस्य उपस्थित होते.