चुरचुरा येथे भव्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिर
ऑक्टोंबर सेवा सप्ताह 2021 अंतर्गत लायन्स क्लब व स्पंदन फाऊंडेशन गडचिरोलीच्या वतीने 3 आक्टोंबर 2021 रोज रविवार ला कै. नामदेवराव उईके विद्यालय चुरचुरा, पो. चुरचुरा, तालुका गडचिरोली येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये स्पंदन फाऊंडेशनचे संचालक डॉक्टर मिलिंद नरोटे, दंतरोग तज्ञ डॉ. धम्मदीप बोधेले, मुळव्याध तज्ञ डॉ. सौरभ नागुलवार, बालरोग तज्ञ डॉ. निखिल चव्हाण, जनरल फिजिशियन डॉ. पंकज कामेलवार यांची सेवा मिळणार आहे. या शिबिरात मोफत शुगर व बीपी तपासणी, बालरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतचिकित्सा, मूळव्याध तपासणी, तसेच जनरल तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.
तरी चुरचुरा गावातील व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान लायन्स क्लब व स्पंदन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अतिश उरकुडे (8380828640) यांच्याशी संपर्क साधावा.
धन्यवाद !
शेषराव येलेकर
लायन्स क्लब गडचिरोली