BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा

पोलीस स्टेशन वरठी अंतर्गत अवैध प्राणी वाहतूक २२ जिवंत गोवंश जनावरे (गायी) जप्त सदर जनावरे ही भगीरथा गौशाला मालिपार, चांदोरी येथे दाखल

Summary

प्रतिनिधी वरठी प्रकरण अशा प्रकारे आहे की यातील आयसर ट्रक क्र. एम एच 36 f 3533 चा आरोपी चालक इम्रान रियाज खान वय 27 वर्षे, रा. चंगेरा पोलीस स्टेशन रजेगाव, ता. जि. गोंदिया हा दिनांक ०४-०५-२०२३ चे १२:१५ वाजताच्या सुमारास […]

प्रतिनिधी वरठी
प्रकरण अशा प्रकारे आहे की यातील आयसर ट्रक क्र. एम एच 36 f 3533 चा आरोपी चालक इम्रान रियाज खान वय 27 वर्षे, रा. चंगेरा पोलीस स्टेशन रजेगाव, ता. जि. गोंदिया हा दिनांक ०४-०५-२०२३ चे १२:१५ वाजताच्या सुमारास बोथली, तुमसर, भंडारा रोड येथे आपल्या ताब्यातील आयसर ट्रक क्र. एम एच 36 f 3533 मधील वाहनात 22 जिवंत गोवंश जनावरे गाय अपुऱ्या जागेत निर्दयतेने त्यांना वेदना व यातना होईल अशा स्थितीत कोंडून कत्तली करिता वाहतूक करीत असताना मिळून आला. आरोपीचे ताब्यातून ७,२०,००० रु. चा माल जप्त करण्यात आल्याने सर तर्फे फिर्यादी सहायक फौजदार 743 माहूर्ले पोलीस स्टेशन वरठी यांचे लेखी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वरठी येथे अप. क्र. 79/2023 कलम 5 (अ) (ब) 9 (ब) महाराष्ट्र आणि प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारणा ४ मार्च २०१५) सहकलम 11 (1) (क) (म) (h) (f) पशुछळ प्रतिबंधक अधिनियम 1996 सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस कायदा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार 743 माहुर्ले हे करीत आहेत. मिळालेला माल
१) २२ जिवंत गोवंश जनावरे गाय किमती २,२०,०००/- रुपये
२) आयसर ट्रक क्र. एम एच 36 एफ 3533किंमत ५,००,०००/- असा एकूण ७,२०,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आले असून; सदर जनावरे ही भगीरथा गौशाला मालीपार चांदोरी येथे दाखल करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *